• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • 'मी कोरोना पॉझिटिव्ह, आता बघा कसा पसरवते', 18 वर्षीय तरुणीने VIDEOद्वारे दिली धमकी

'मी कोरोना पॉझिटिव्ह, आता बघा कसा पसरवते', 18 वर्षीय तरुणीने VIDEOद्वारे दिली धमकी

18 वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर व्हायरल केला व्हिडीओ. आता पोलिसांनी आपल्या स्टाईलने केले तिच्यावर उपचार.

 • Share this:
  टेक्सस, 06 एप्रिल : कोरोनामुळे साऱ्या जगात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीतही लोकांना मस्करी सुचत आहे. एक तरुणीने मी कोरोना पॉझिटिव्ह, आणि आता मी कोरोना पसरवणारा, असे म्हणत एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. यात तीनं जाणीवपूर्वक कोरोना पसरवणार असल्याचे म्हंटले होते. हा व्हिडीओ अमेरिकेच्या टेक्सासमधील कॅरोल्टन शहरात राहणाऱ्या तरुणीचा आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी ट्वीट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे. संबंधित मुलीची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, परंतु अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही. या व्हिडिओमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव केल्याचा दावा करणार्‍या मुलीचे नाव लॉरेन मराडियागा असे पोलिसांनी सांगितले आहे. लॉरेनवर दहशत पसरविण्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. तर, लॉरेनकडून सामान्य लोकांना खरोखर धोका आहे की नाही, हे पाहिले जाणार आहे. तसेच लॉरेनची कोरोना चाचणीही करण्यात येणार आहे. त्यामुळं सोशल मीडियावर मस्करी करने आता लॉरेनला महागात पडू शकतं. याआधी पोलिसांनी लोकांच्या मदतीने या मुलाचा शोध घेतला. ही मुलगी 18 वर्षांची असून, तिच्या व्हिडीओबाबत तिच्या कुटुंबियांना माहिती नसल्याचे पोलिस तपासात समोर आले. अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार कोरोनाने महासत्ता असलेल्या अमेरिकेचे कंबरडे मोडले आहे. अमेरिकेत 3 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, कोरोनामुळे जवळजवळ 10 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात सर्वात वाईट परिस्थिती आहे. न्यूयॉर्कला दुसरे वुहान म्हणून ओळखले जात आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: