न्यूयॉर्क, 08 एप्रिल : कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप कोणत्याही देशाला यावर ठोस उपाय किंवा लस शोधता आलेली नाही. त्यामुळं हात स्वच्छ धुणे, मास्क किंवा ग्लोव्ह्जचा वापर करणे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मात्र ग्लोव्ल्जमुळे कोरोनाही पसरू शकतो, असा धक्कादायक खुलासा अमेरिकेतील एका नर्सने केले आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये अमेरिकेतील परिचारिका मौली क्रास यांनी ग्लोव्ह्ज कसा वापरावा हे सांगितले आहे. यासाठी त्यांनी हाताला रंग लावला, आणि त्यानंतर ग्लोव्ह्ज घातले. त्यांच्या हाताचा रंग ग्लोव्ह्जला लागला, त्याचप्रमाणे कोरोनाविषाणू तुमच्या हातावर असेल आणि तुम्ही ग्लोव्ह्ज वापरले, तर आणखी वेगाने तो शरीरात पसरण्याची शक्यता आहे. ग्लोव्ह्ज घालण्यापेक्षा हात धुण्यास प्राधान्य द्या, असेही या व्हिडीओमध्ये मौली म्हणाल्या. वाचा- ‘मी कोरोना पॉझिटिव्ह, आता बघा कसा पसरवते’, तरुणीने VIDEOद्वारे दिली धमकी
"This is called cross-contamination."
— ABC News (@ABC) April 6, 2020
A Michigan nurse used paint to show how easy it is to spread germs even while wearing gloves. https://t.co/h1DXaKEOUE pic.twitter.com/lnuLrHNA5F
वाचा- 6 वर्षांच्या मुलानं मृत्यूला हरवलं, फुफ्फुसाच्या आजारानंतर आता कोरोनावर मात मौली यांचा 2 मिनिटे 49 सेकंदाचा व्हिडीओ एबीसी न्यूजने शेअर केला आहे. यात त्यांनी, “ग्लोव्ह्जचा वापर केला आणि तरी मी फोनला हात लावला. घरी गेले. त्याच हातांनी भाजी साफ केली. जेवण तयार केले, यासगळ्यामुळे तुमच्या हातावरचा विषाणू हा तुम्ही स्पर्श केलेल्या सर्व वस्तूंना लागू शकतो. त्यामुळं ग्लोव्ह्ज वापरण्यापेत्रा हात स्वच्छ ठेवा, तोंडाला स्पर्श करू नका, आणि ग्लोव्ह्ज कचऱ्यात फेकून द्या”, असे सल्ला दिला. वाचा- माणसातला देव! घरच्यांनी साथ सोडली, तरी डॉक्टरांनी रुग्णाला हातांनी भरवलं जेवण जगभरात सध्या कोरोनामुळे मास्क आणि ग्लोव्ह्जचा तुटवडा आला आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही मास्क मिळत नाही आहेत. त्यामुळेच मौली यांनी लोकांना जास्तीत जास्त वेळा हात धुण्याचे आवाहन केले आहे.