कोची, 11 जानेवारी : केरळच्या कोची येथील मरडू नगरपालिका क्षेत्रात बांधण्यात आलेल्या चार इमारती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाखाली पाडण्यात येत आहेत. शनिवारी काही इमारती जमीनदोस्त केल्यानंतर आज सकाळच्या सुमारास जैन कोरल कोव्ह कॉम्प्लेक्स रविवारी पाडण्यात आली. याआधी 19 मजली एच2ओ होलीफेथ अपार्टमेंट पाडण्यात आलं. फक्त यामध्ये 90 फ्लॅट होते. इतर कोणतीही हानी होऊ नये यासाठी भागात कलम 144 लागू करण्यात आले होते. समुद्र किनाऱ्यावर बांधाकाम नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या दोन इमारती पाडण्याआधी परिसरात ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इशारा दिला होता. हा परिसर धोकादायक असून कोणताही धोका प्रशासन पत्करू इच्छित नाही असं पोलिस महानिरीक्षक विजय सखारे यांनी म्हटलं होतं. यासाठी परिसरात 500 पोलिस कर्मचारी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी 300 स्ट्रायकर दलांना कामाला लावले होते. वाचा- केस कापायला गेलेल्या ब्रिटनच्या राजदूताला इराणने सलूनमधूनच उचललं
वाचा- या फलंदाजाची पत्नी आहे सर्वात HOT अॅकर, सोशल मीडियावर बिकिनी फोटोंचा धुराळा! पोलिसांनी दोन दिवस आधी एक पत्रक जारी करून इमारत पडताना बाहेर कोणत्याही ठिकाणाहून पाहू शकता असं सांगितलं होतं. तसेच ज्या इमारती पाडायच्या आहेत त्यातील रहिवाशांना घर सोडण्यापूर्वी सर्व वीज उपकरणे बंद कऱण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच आजुबाजुच्या परिसरात घरांना धुळीपासून वाचवण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे बंद करण्याचा सल्ला दिला होता. वाचा- तारापूर स्फोट : आईचा मृत्यू तर बहीण बेपत्ता, चिमुकलीचा VIDEO आला समोर एच2ओ होलीफेथ अपार्टमेंट, अल्फा सेरिन, जैन कोरल कोव्ह अपार्टमेंट, गोल्डन कोयालोरम या इमारती अनधिकृत बांधकामात असल्याचे आढळले होते. यामध्ये मिळून एकूण 343 फ्लॅट बांधण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2019 मध्ये या परिसरातील अनधिकृत बांधकाम 138 दिवसांच्या आत पाडण्याचे आदेश दिले होते.