तेहरान, 12 जानेवारी : ब्रिटनच्या राजदूतांना शनिवारी तेहरानमध्ये अटक करण्यात आली. सरकार विरोधी निदर्शनात सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यांना अटक केल्यानंतर काही वेळात सुटका करण्यात आली. युक्रेनचं विमान चुकून पाडल्यानंतर इराणमध्ये सरकारविरुद्ध आंदोलन केलं जात आहे. ब्रिटनच्या दूतावासानेही आंदोलनात सहभागी झाल्याचा आणि नागरिकांना भडकावल्याचा आरोप करण्यात आला. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचं इराणने म्हटलं आहे.
ब्रिटनचे राजदूत विमान दुर्घटनेतील मृत नागरिकांच्या शोकसभेत सहभागी झाले होते. त्यावेळी शोकसभेत विरोध प्रदर्शन करण्यात आला. तिथून दूतावासात परत जात असताना ते एका सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेले होते. तिथे थांबले असतानाच त्यांना अटक करण्यात आली. शेवटी आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांची सुटका करण्यात आली. इराणच्या एका स्थानिक माध्यमाने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे.
इराणमधील ब्रिटनचे राजदूत रोब मकायर यांना अटक केल्याबाबत बोलताना ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं की, कोणत्याही आधाराशिवाय आणि नियमाशिवाय तेहरानमध्ये आमच्या राजदूताला अटक केली आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघडपणे उल्लंघन आहे. आम्ही इशारा देतो की त्यांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा किंवा पुढच्या कारवाईला सामोरं जावं.
सरकारविरोधात आंदोलनामध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलकांनी इराणचे नेते आयतुल्ला अली खामनेई यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आंदोलकांचे समर्थन करत पाठिंबा दिला आहे.
विमान दुर्घटना नव्हे चूक! अमेरिकेनं 31 वर्षांपूर्वी केलं तेच आता इराणकडून घडलं
इराणकडून चुकून 176 प्रवासी असलेलं युक्रेनचं विमान पाडलं गेल्याचं लष्कराकडून मान्य करण्यात आलं आहे. त्याआधी अमेरिका, कॅनडाने इराणवर विमान पाडल्याचा आरोप केला होता. त्यावेळी इराणने आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांनी लष्कराच्या चौकशीत चुकीमुळे इराणनेच विमान पाडल्याचं सांगितलं होतं. या दुर्घटनेत 176 प्रवाशांचा प्राण गेला.
176 प्रवाशांच्या विमानावर इराणनेच डागले क्षेपणास्त्र? समोर आला खळबळजनक VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iran