तारापूर स्फोट : आईचा मृत्यू तर बहीण बेपत्ता, चिमुकलीचा VIDEO आला समोर

तारापूर स्फोट : आईचा मृत्यू तर बहीण बेपत्ता, चिमुकलीचा VIDEO आला समोर

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.

  • Share this:

पालघर, 12 जानेवारी : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एनडीआरएफचे पथक बचावकार्य करत आहे. स्फोट इतका भीषण होता की, इमारत पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. दरम्यान, या स्फोटात एका चिमुकलीच्या आईचा मृत्यू झाला असून तिची लहान बहिण बेपत्ता आहे. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राची यादव असं या चिमुकलीचं नाव आहे. आईला बाहेर काढल्याचं तिला माहिती आहे पण सध्या आई कुठे आणि  कशी आहे याची तिला कल्पना नाही.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एम 2 या प्लॉटमधील कारखान्यात शनिवारी संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांला भीषण स्फोट झाला. या अपघातांमध्ये कंपनीच्या मालकासह 7 जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी तारा नाईट्रेट या नावाने ओळखली जाणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे कंपनीच्या परिसरातील एक इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार दबले गेल्याची भीती वर्तवली जात आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.

एनडीआरएफच्या शोधमोहीमेदरम्यान ढिगाऱ्याखाली आणखी एक मृतदेह आढळला. या दुर्घटनेत 7 जण जखमी आहेत. मृतांमध्ये कंपनीच्या मालकाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकाला 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जाईल, असेही सांगितले आहे. जखमींवर तुंगा रुग्णालयात उपचार सुरु आहे

कंपनीमध्ये अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगण्यात येत असून या स्फोटाचा आवाजाने 25 ते 30 किलोमीटरचा परिसर हादरला. अनेक नागरिकांना पालघर भागात भूकंप झाल्याचा सुरुवातीला अनेकांना भास झाला. मात्र, काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचे स्पष्ट झाले.

स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून जखमी आणि मृत कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या कंपनीच्या आवारामध्ये आतापर्यंत  6 कामगारांचा मृत्यू झाला आहे. कंपनीच्या आवारामध्ये काही रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  प्रत्येकी 5 लाख रुपयांची घोषित केली असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव आणि जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: palghar
First Published: Jan 12, 2020 08:45 AM IST

ताज्या बातम्या