JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊनमध्ये फुललं प्रेम; अन्नदान करताना भीक मागणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला आणि केला विवाह

लॉकडाऊनमध्ये फुललं प्रेम; अन्नदान करताना भीक मागणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला आणि केला विवाह

सध्या Coronavirus च्या सगळ्या नकारात्मक वातावरणातही प्रेमाला अंकुर फुलू शकतो आणि रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीवरही प्रेम जडू शकतं, याचा दाखला या व्हायरल होत असलेल्या लग्नाच्या फोटोंतून मिळतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कानपूर, 23 मे : प्रेम कधी, कुणाचं, कुणाबरोबर जमेल सांगता येत नाही. सध्या Coronavirus च्या सगळ्या नकारात्मक वातावरणातही प्रेमाला अंकुर फुलू शकतो आणि साध्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीवरही प्रेम जडू शकतं, याचा दाखला उत्तर प्रदेशातल्या एका अनोख्या विवाह सोहळ्याने दिला आहे. कानपूरमध्ये राहणाऱ्या अनिल आणि नीलम यांच्या प्रेम आणि लग्नाची ही अनोखी गोष्ट. या प्रेमाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि त्यांच्या लग्नाचे व्हीडिओही सगळीकडे शेअर होत आहेत. नीलमचे आई-वडील नाहीत. ती आपल्या भावाबरोबर राहात होती. भाऊ आणि वहिनीशी न पटल्याने तिला त्यांनी घर सोडायला लावलं. बेसहारा नीलमला रस्त्यावर राहण्यावाचून पर्याय उरला नाही. ती भिकाऱ्यांबरोबर राहू लागली आणि कुणी देईल ते, मिळेल ते खाऊ लागली. त्याच वेळी कोरोनाव्हायरसची साथ सुरू झाली आणि देशभरात लॉकडाऊन झाला. तसा कानपूरमध्येही लॉकडाऊन जाहीर झाला. रोजचं दोन वेळचं पोट भरणं मुश्कील झालं. हे वाचा-  नवरा बायकोच्या भांडणाचं कारण Google maps, पतीने पोलिसात घेतली धाव काही दानशूर लोक अन्नदान करत त्याच वेळी नीलम आणि तिच्यासारख्या भिकाऱ्यांचं पोट भरत असे. नीलम कानपूरच्या ज्या भागात आश्रयाला होती, तिथून एक लालता प्रसाद नावाचे व्यापारी जात होते. त्यांनी नीलमला पाहिलं आणि तिला जेवण दिलं. या भागातल्या गरजवंतांना रोज जेवण पुरवायचं काम त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे सोपवलं. ड्रायव्हर अनिल जेवण द्यायच्या निमित्ताने आता रोजच या भागात येऊ- जाऊ लागला. त्यातून त्याची नीलमशी ओळख झाली आणि वाढली. त्या दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलू लागला. 45 दिवस सलग अनिल या भागात अन्नदान करण्याच्या निमित्ताने येत होता. अनिलच्या आई-वडिलांना या प्रेमाविषयी समजलं, तेव्हा त्यांनी नीलमची भेट घेऊन ती लग्न करायला तयार आहे का विचारलं. नीलम आणि अनिलचं अशा प्रकारे लग्न ठरलं. अन्य बातम्या या टेस्टनं फक्त 20 मिनिटांत रिझल्ट येणार; ऑन द स्पॉट कोरोना रुग्णाचं निदान होणार ‘या’ रेल्वेसाठी तिकीट बुक करण्याच्या नियमांत बदल,30 दिवस आधी करावं लागणार आरक्षण 1 जूनपासून सुटणाऱ्या 200 स्पेशल गाड्यांसाठी रेल्वेने बनवले नियम

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या