ब्रिटन, 23 मे : सध्या कोरोना चाचणीसाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते, ज्याचा रिपोर्ट यायला खूप कालावधी जातो. मात्र आता फक्त 20 मिनिटांत कोरोना टेस्ट होणार आहे आणि ऑन द स्पॉट कोरोना रुग्णाचं निदान होणार आहे. ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाची अशी नवी टेस्ट किट (test kit) विकसित करण्यात आलं आहे. यूकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉका यांनी या टेस्टबाबत माहिती दिली आहे. द सन च्या रिपोर्टनुसार आरोग्य सेक्रेटरी मॅट हॅनकॉक यांनी सांगितलं की, सध्या स्वॅब टेस्टमार्फत कोरोना चाचणी केली जाते आहे. मात्र या टेस्टमध्ये रिपोर्ट येण्यात खूप वेळ जातो. आता तसं नाही होणार. ब्रिटन सरकारनं ही टेस्ट किट तयार करणाऱ्या रॉश कंपनीशी चर्चा केली आहे. गरजूंची टेस्ट मोफत केली जाणार आहे. अँटिबॉडी टेस्टमार्फत एखाद्या व्यक्तीला कोरोनाव्हायरस झाला होता की नाही हे समजतं. त्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडी विकसित झाल्यात की नाही हे समजतं. तर स्वॅब टेस्टमार्फत एखाद्या व्यक्तीला आता कोरोनाव्हायरस आहे की नाही आणि तो कोरोना संक्रमित असेल तर त्याला सेल्फ आयसोलेट असण्याची गरज आहे की नाही हे समजतं. हे वाचा - कोरोना झाला तरी सोडली नाही जगण्याची जिद्द, 100 वर्षांच्या आजींनी जिंकलं युद्ध मात्र ही नवी टेस्ट या दोन्ही टेस्टपेक्षा वेगळी आहे. ही टेस्ट लॅबमध्ये करण्याची गरज नाही. तर ऑन द स्पॉट चाचणी करून फक्त 20 मिनिटांतच त्याचे रिपोर्ट येतात. एखाद्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसची लागण झालेली आहे की नाही हे तेव्हाच्या तेव्हा समजणार आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये ही टेस्ट यशस्वी ठरली आहे. आता ही टेस्ट प्रत्यक्षात करण्यासाठी तयारी सुरू आहे.
व्हॅक्सिनसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधन दुसऱ्या टप्प्यात
ऑक्सफर्ड विद्यापीठातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. याठिकाणी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अशी माहिती दिली आहे की, व्हॅक्सिन शोधण्याच्या सुरूवातीच्या टप्प्यात यश मिळाले आहे आणि ते मानवी स्तरावरील चाचणीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये जाणार आहेत. आज तक ने दिलेल्या बातमीनुसार दुसऱ्या स्तरावरील तपासणीसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील संशोधक परिक्षणासाठी 10,000 हून अधिक लोकांची भर्ती करणार आहेत. हे वाचा - भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येनं वाढवली चिंता, WHO ने 7 राज्यांना दिला सल्ला कोरोनाची लस शोधण्यासाठीचे पहिले परिक्षण गेल्या महिन्यात सुरू झाले होते. ज्यामध्ये 55 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या 1000 प्रौढ स्वयंसेवकांवर ट्रायल करण्यात आली होती. आता रोग प्रतिकारक्षमतेवर होणारा परिणाम लक्षात घेण्यासाठी 70 वर्षापेक्षा जास्त आणि 5 ते 12 वर्ष वय असणारी मुलं असे एकूण 10,200 लोकांपेक्षा अधिक लोकांना तपासणीसाठी नामांकित करण्यात येणार आहे.

)







