मुंबई, 22 मे : गुगल मॅप हा सध्या सगळ्यांचा खास मित्र झाला आहे. अनोळखं ठिकाण असो किंवा एखाद्या ठिकाणचा पत्ता शोधायचा असूदे लगेच गुगल मॅपला विचारलं जातं. अगदी ट्रॅफिकपासून पेमेंटपर्यंतच्या अनेक गोष्टी गुगल मॅपवर पाहायला मिळतात. सर्वांचा प्रिय मित्र असणारं हे गुगल मॅप मात्र एका दाम्पत्याच्या भांडणाचं कारण झालं आहे. या अॅपविरोधात चक्क एका पतीने पोलिसांत तक्रार दिली. याचं कारणही तितकच गमतीशीर आहे. या अॅपने त्याच्या सुखी वैवाहिक संसारात मोठं वादळ आणलं आहे. नेमकं काय आहे प्रकरण का केली पोलिसात तक्रार? नागापट्टिनम जिल्ह्यातील मायलादुथुरै येथील 49 वर्षांच्या व्यक्तीसाठी, Google maps डोकेदुखी झाला आहे. यामुळे त्यांचा वाद टोकाला जाऊन काडीमोड घेण्याची वेळ आली. लाल बहादूर नगर, माईलादुथुराई येथील रहिवासी आर. चंद्रशेखरन म्हणाले की, ‘गुगल मॅप्स’च्या माध्यमातून पत्नी आपल्या हालचालींवर लक्ष ठेवते. अशा परिस्थितीत अॅपदेखील त्याला कधीही नसलेल्या ठिकाणांविषयी सांगते. हे वाचा- कोरोनाला हरवलं, आता बर्फाचा डोंगर सर करायला गिर्यारोहक तयार मिळालेल्या माहितीनुसार आर.व्ही. चंद्रशेखरन यांनी गुरुवारी गुगल मॅप विरोधात स्थानिक पोलिसात तक्रार दाखल केली. जिथे मी कधीही गेलो नाही अशा ठिकाणी मी जाऊन आल्याचं गुगल आपल्या मॅपवर लोकेशन हिस्ट्रीमध्ये दाखवत आहे. त्यामुळे माझ्यात आणि पत्नीमध्ये यामुळे खूप वाद होत आहेत. जी ठिकाण मी कधी पाहिली नाहीत किंवा माहीतही नाहीत अशा ठिकाणी जाऊन आल्याचा दावा गुगल मॅप करत आहे. या सगळ्या प्रकारामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्या आहेत. पतीला करत होती ट्रॅक आणि त्यामुळे झाले वाद अलीकडेच 20 मे रोजी एक घटना घडली. चंद्रशेखरन यांनी टीओआयला सांगितले, “जेव्हा माझ्या पत्नीने मला तेथे जाण्यास सांगितले तेव्हा आम्ही दोघांमध्ये भांडण झाले आणि मी तिथे जाण्यास नकार दिला.” तिने माझ्यावर अविश्वास दाखवून मला ट्रॅक करायला सुरुवात केली. त्यामुळे पती खोटं बोलतो यावरून पत्नीनं वाद घालण्यास सुरुवात केली. चंद्रशेखरन यांचं म्हणणं पोलिसांनी ऐकून घेतलं आहे परंतु अजून कोणताही FIR दाखल करण्यात आला नाही अशी माहिती मयिलादुथुराई पोलीस स्थानकातून समोर आली आहे. हे वाचा- एका लग्नामुळे गाव आलं अडचणीत, क्वारंटाइन सेंटरमधून बाहेर पडलं जोडपं आणि… संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







