तो अध्यादेश राहुल गांधींनी फाडला. तो अध्यादेश असता तर राहुल गांधींची खासदारकी वाचली असती.
नवी दिल्ली, 29 मार्च : ‘माफी मागायची नसेल तर मागू नका, पण सावरकरांबाबत असं वक्तव्य करू नका. या देशात सर्वाधिक यातना सहन करणाऱ्यांपैकी सावरकर आहेत. स्वातंत्र्याच्या संग्रामात एकाच व्यक्तीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. अशा वीर हुतात्मांसाठी असे शब्द प्रयोग करणं चुकीचं आहे. आमच्यावर विश्वास नसेल, तर त्यांनी त्यांच्या आजीचं त्यांनी ऐकावं. शिवसेना आणि शरद पवार काय म्हणत आहेत, ते ऐकावं, असं म्हणत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींला सुनावलं. नेटवर्क 18 च्या वतीने रायझिंग इंडिया हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहा यांची नेटवर्क 18 चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अमित शहा यांनी राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केलं.
‘माफी मागायची नव्हती तर त्यांनी जामिनाचा अर्जही नाही करायला पाहिजे होती. गांधींना ब्रिटिशांनी शिक्षा दिली तेव्हा त्यांनी दंड भरला नाही, माफीही मागितली नाही. माफी मागायची नसेल तर मागू नका, पण सावरकरांबाबत असं वक्तव्य करू नका. या देशात सर्वाधिक यातना सहन करणाऱ्यांपैकी सावरकर आहेत. स्वातंत्र्याच्या संग्रामात एकाच व्यक्तीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. अशा वीर हुतात्मांसाठी असे शब्द प्रयोग करणं चुकीचं आहे. आमच्यावर विश्वास नसेल, तर त्यांनी त्यांच्या आजीचं त्यांनी ऐकावं. शिवसेना शरद पवार काय म्हणत आहेत, ते ऐकावं, असंही शहांनी राहुल गांधींनी सुनावलं. (Rising India : काँग्रेसकडून तुम्हाला कधी ऑफर आली का? नितीन गडकरींनी एका वाक्यात दिले उत्तर) काँग्रेस नेते भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा झाली तर प्रत्येक व्यक्तीला शिक्षेला आणि दोषाला स्थगिती करायला 3 महिन्यांचा वेळ मिळायचा. कनव्हिक्शन स्टे करता येत नाही, शिक्षा स्थगित करता येते. पण थॉमस केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 3 महिन्यांचं प्रावधान काढून टाकली. लालूंना वाचवण्यासाठी मनमोहन सरकार अध्यादेश घेऊन आले. पण तो अध्यादेश राहुल गांधींनी फाडला. तो अध्यादेश असता तर राहुल गांधींची खासदारकी वाचली असती. राहुल गांधींनी अजूनही या निकालाला आव्हान दिलेलं नाही, त्यांच्यात कोणता अहंकार आहे? असा सवाल करत अमित शहांनी राहुल गांधींवर टीका केली. (धर्मेंद्र प्रधान म्हणाले- राहुल गांधींनी ओबीसी समाजाला शिवी दिलीये, अन् आता तर…') लालू प्रसाद यादव, जयललिता, राशिद अल्वी यांच्यासह 17 जणांची खासदारकी गेली. पण कुणीही काळे कपडे घातले नाहीत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. देशाच्या एका व्यक्तीसाठी कायदा बदलायचा का?ते कायदा वाचणार नाहीत, त्यांना समजणारही नाही. पण काँग्रेसकडे राज्यसभेत बसणारे मोठे वकील आहेत, तेही काही समजावत नाही. लोकसभा अध्यक्षही काही करू शकत नाहीत. ज्या वेळी तुम्ही दोषी ठरलात तेव्हाच तुमचं सदस्यत्व गेलं. त्यांना मोदी विरुद्ध राहुल करूदे, भाजपसाठी विजयाचा यापेक्षा मोठा फॉर्म्युला कोणता असेल? असा सवाल अमित शहांनी केला. ‘त्यांनी फक्त मोदींना नाही, तर मोदी समाज म्हणजेच तेली समाजाविषयी ते बोलले. सगळ्या चोरांचं आडनाव मोदीच का असतं? असं ते म्हणाले. त्यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला, अशी टीकाही अमित शहांनी केली.