नवी दिल्ली, 29 मार्च : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की, सबका साथ सबका विकास. हा पक्ष कुणा एका पक्षाचा नाही. हा देश लोकांचा आहे. माझ्याकडे विरोधकांची सुद्धा काम येत असतात. त्यांची काम जर योग्य असेल आणि नियमांना धरून असेल तर ती काम सुद्धा मी करत असतो. एवढंच नाहीतर लोकांनी सुद्धा कामं विचारली तरी मी ती करत असतो’ असं परखड मत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विचारला आहे. नेटवर्क 18 च्या वतीने रायझिंग इंडिया हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सामील झाले होते. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
वाजपेयी यांनी नेहमी सांगितलं आहे की, ‘मतभेद असले पाहिजे, पण मनभेद नसले पाहिजे’. मी लहानपणा पासून सावरकर यांच्याबद्दल वाचत आलोय. सावरकर यांचं माझी जन्मठेप हे पुस्तक वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी देशासाठी काय आयुष्य वाहिलं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी काय सहन केलं, भाऊ, पत्नी यांनी तुरुंगवास भोगला. हे एकदा वाचून त्यांनी बोललं पाहिजे, असं म्हणत नितीन गडकरी यांनी सावरकरांच्या मुद्यावरून विरोधकांना खडेबोल सुनावले. (Rising India : जलाशय कचरामुक्त ठेवण्यासाठी तरुणाचा लढा! News18 कडून रिअल हिरोचा सन्मान) तुम्हाला काँग्रेसच्या काळात कधी ऑफर आली नाही का? असा प्रश्न विचारला असता नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की, सबका साथ सबका विकास. हा पक्ष कुणा एका पक्षाचा नाही. हा देश लोकांचा आहे. माझ्याकडे विरोधकांची सुद्धा काम येत असतात. त्यांची काम जर योग्य असेल आणि नियमांना धरून असेल तर ती काम सुद्धा मी करत असतो. एवढंच नाहीतर लोकांनी सुद्धा कामं विचारली तरी मी ती करत असतो’ तसंच, भारत हा इलेक्ट्रोलायझर बनवण्यात भारताचा पहिला क्रमांक आहे. ज्याद्वारे हायड्रोजन पाण्यापासून वेगळे केले जाते. आम्ही लवकरच सर्वत्र हायड्रोजन इंधन वापरणार आहोत, असंही गडकरी म्हणाले. (‘ठाकरे गटातील 2 खासदार संपर्कात’; केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांचा Rising India मध्ये गौप्यस्फोट) दिल्लीत कचऱ्याचे दोन मोठाले डोंगर बनले आहे. त्याच्या परिवर्तनाचे काम आम्ही केले आहे. कचऱ्याचा पुनर्वापर करून आम्ही महामार्ग बनवला. आम्ही आता वीज आयात करत नाही तर वीज निर्यातदार बणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असंही गडकरी म्हणाले. रस्त्याशी संबंधित कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षेबाबत प्रत्येकाने जागरुक असायला हवे. रस्ता सुधारत आहे. रस्त्याने विकास होतो, शहरांमधील अंतर आम्ही कमी करत आहोत. बायोगॅस बनवण्यासाठी योजनेवर काम सुरू आहे, हायड्रोजनचा वापर वाढवला जाणार आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली.

)







