नवी दिल्ली, 29 मार्च: रायजिंग इंडियाच्या मंचावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टिका केली. राहुल गांधींनी ओबीसींना शिवी दिली. आता तर त्यांना स्वतःचा कायदा हवा असतो. असं ते म्हणाले. तसंच ते म्हणाले की, त्रिपुरामध्ये भारपने दोन वेळा विजय मिळवला आहे. यावेळी कर्नाटकातही भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. तसंच कर्नाटकात मोदींची ब्रांड व्हॅल्यू आणि येदुरप्पा आणि बोम्मईजींचे काम लोकांना आवडत आहे. दक्षिण भारताची आरक्षण निती वेगळी आहे. येथे काँग्रेस आरक्षण नितीचा छुपा विरोध करते.
एस. जयशंकर यांनी शेअर केलं त्यांच फिटनेस सीक्रेट, ‘हा’ आहे आवडता क्रिकेटरराहुल गांधींवर सोडलं टिकास्त्र
धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केला आहे. ओबीसी समाजाला त्यांनी शिवी दिली आहे. एवढंच नाही तर ते माफी मागणंही टाळत आहेत. काही लोकांना वेगळा कायदा हवा असतो. हे माझं मत नाही तर त्या पक्षातील जबाबदार नेते म्हणतात की, त्या खानदानावर कशी केस होऊ शकते. तुम्ही भारताच्या आयपीसीला चॅलेन्ज कराल आणि त्यात तुम्ही गुन्हेगार सिद्ध व्हाल. जर तुमच्यावर कारवाई झाली तर तुम्ही तुमचा खानदानी अधिकार दाखवू शकत नाही.असं म्हणत प्रधान यांनी राहुल गांधींवर टिकास्त्र सोडलं. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सुरत येथील न्यायालयाने 2019 च्या मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान त्यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी त्यांना अपात्र ठरवण्यात आलेय.
#News18RisingIndia: Union minister @dpradhanbjp on Rahul Gandhi's disqualification, "Rahul Gandhi disrespected the OBC community. This is not the first time he did this."#KarnatakaElections2023 | @maryashakil pic.twitter.com/Fi5hsoMNXj
— News18 (@CNNnews18) March 29, 2023
भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा 2020 अंतर्गत अभ्यासक्रमातील बदलांबाबत धर्मेंद्र प्रधान यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘मला इतिहास दुरुस्त करायचा आहे, असे मी कधीच म्हटले नाही…काहीही काढून टाकले जाणार नाही, परंतु भारताच्या इतिहासातील गायब झालेल्या नायकांच्या कहाण्या येथे टाकण्याचे आमचे ध्येय आहे.’

)







