सीमा हैदर प्रकरणात मोठा दावा
दिल्ली, 23 जुलै : भारत- नेपाळ मैत्री बस सेवा ही फक्त भारत आणि नेपाळमधील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ भारत आणि नेपाळ वगळता तिसऱ्या कोणत्याही देशाचा नागरिक घेऊ शकत नाही. मात्र पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर याच बसनं भारतात आल्याची माहिती आता समोर आली आहे. पोखरास्थित भारत-नेपाळ मैत्री बसचे उच्चपदस्थ अधिकारी टिकाराम अधिकारी यांच्याकडून हा दावा करण्यात आला आहे. सोबतच त्यांनी या सर्व प्रकरणाची कडक चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे. काय आहे नेमका दावा? नेपाळ बस सेवेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून सीमा हैदर प्रकरणात मोठा दावा करण्यात आला आहे. टिकाराम यांनी म्हटलं की, सीमा गुलाम हैदर ही महिला खूप चतूर आहे. तिला माहित होते की, पाकिस्तानमधून थेट भारतामध्ये जाणे अशक्य आहे. त्यामुळे तीने या मार्गाचा अवलंब केला. तिच्या या प्लॅनमध्ये आणखी काहीजण सहभागी असण्यची शक्यता आहे. ज्या लोकांनी सीमाला मदत केली त्या लोकांना नेपाळमधून भारतात येणाऱ्या सर्व रस्त्यांची माहिती होती. त्यांनी या सर्व रस्त्यांची माहिती सीमाला चांगल्याप्रकारे दिली होती, असा दावा या अधिकाऱ्याने केला आहे.
PHOTOS : सीमा नव्हे म्हणे मी मीना, प्रत्येक पावलावर ती बोलली खोटं, बस वाल्यांनाही दिला धोकाखोटी माहिती दिल्याचा संशय ‘न्यूज 18’ शी बोलताना टीकाराम यांनी मोठा दावा केला आहे. सीमा हैदरला पाकिस्तानहून नेपाळला आणि नेपाळहून पुढे भारतात येण्यासाठी कोणी तरी मदत केली. कोणी तरी अशी व्यक्ती होती, ज्या व्यक्तीने तिला या सर्व मार्गावर मदत केली. केवळ भारत आणि नेपाळमधील नागरिकांनाच मिळणाऱ्या या बस सेवेचा सीमा हैदरने फायदा घेतला. बॉर्डरवर सर्व प्रवाशांची कडक चेकींग होते, मात्र इथेही तीने खोटी माहिती दिली असावी, असं टिकाराम यांनी म्हटलं आहे.