advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / PHOTOS : सीमा नव्हे म्हणे मी मीना, प्रत्येक पावलावर ती बोलली खोटं, बस वाल्यांनाही दिला धोका

PHOTOS : सीमा नव्हे म्हणे मी मीना, प्रत्येक पावलावर ती बोलली खोटं, बस वाल्यांनाही दिला धोका

पाकिस्तानातून अवैधपणे भारतात आलेली महिला सीमा हैदर सध्या बरीच चर्चेत आहे. सीमा गुलाम हैदरची चौकशी आता यूपी एटीएसकडून संपली आहे. परंतु अद्यापही सीमाला एटीएसकडून क्लीन चिट देण्यात आली नसून याप्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता आणखी याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

01
न्यूज 18 इंडियाला मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात प्रवेश करण्यासाठी सीमा ही विविध ठिकाणी खोटं बोलली. सीमा आणि तिचा प्रियकर सचिन यांनी हॉटेल न्यू विनायक, काठमांडू, नेपाळ येथे खोटे नाव आणि पत्ता नोंदवला होता. तसेच सीमा ज्या बसमधून 12 मे रोजी भारतात दाखल झाली, त्या बसच्या व्यवस्थापकालाही तिने आपली खरी ओळख लपवून खोटी माहिती दिली.

02
सृष्टि बस सर्व्हिसचे मॅनेजर प्रसन्ना गौतम यांनी न्यूज 18 इंडियाला सांगितले की, सीमाने स्वत:ची ओळख भारतीय नागरिक असल्याचे सांगून नाव मीना असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदनेर नेपाळची राजधानी काठमांडूमार्गे पोखरा येथे पोहोचली. यानंतर तिने एका हॉटेलमध्ये रात्र काढल्यानंतर ती सकाळी सृष्टी बस सर्व्हिस कार्यालयात पोहोचली. याठिकाणी तिने बस सर्व्हिसचे व्यवस्थापक गौतम यांच्याकडून लोकेशन मागितले आणि संपूर्ण माहिती घेतली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता ती पोखरा येथील झिरो माईल परिसरातील सृष्टी बस सेवा कार्यालयात पोहोचली.

03
मॅनेजर प्रसन्ना गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाने 4 सीट बुक केले होते. बस कर्मचाऱ्यांनी सीमा हैदरला तिच्याकडे ओळखपत्र आहे का, असे विचारले असता तिने स्वतःकडे ओळखपत्र असल्याचे सांगित ती बसमध्ये बसली. “सीमाने 11 मे रोजी त्यांच्या कार्यालयात संपर्क साधला होता. तसेच येथे तिने आपले नाव मीना असल्याचे सांगितले. यानंतर ती 12 मे रोजी येथून निघून गेली आणि तिच्यासोबत 4 मुलेही होती, असे त्यांनी सांगितले’’.

04
'सकाळी 7 वाजेची बस होती. तिच्यासोबत 4 मुलं असल्याने आम्ही तिला थोडी सूटही दिली. तिने येथे 12 हजार रुपये दिले होते, तसेच उर्वरित 6 हजार रुपये तिच्या सोबतीच्या मदतीने दिल्लीत दिले.

05
दरम्यान, न्यूज 18 इंडियाच्या हाती सीमा हैदरची व्हॉट्सअॅप चॅट आली आहे. या चॅटमध्ये, बस कर्मचार्‍यांनी सीमा हैदरला गुगल पेवर पेमेंट केल्यानंतर स्क्रीन शॉट्स पाठवण्याविषयी लिहिले आहे. यावर सीमा हैदरने मीना या नावाने सेव्ह केलेला नंबर बस सेवेतील व्यक्तीला पाठवला. तसेच त्यात लिहिले की, 'भाई, कृपया तिला एक मेसेज पाठवा.' सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाने सचिनचा नंबर मीना जींच्या नावाने सेव्ह केला होता आणि सचिनने सीमाच्या बस तिकिटाचे उर्वरित पैसे दिले.

06
मॅनेजर प्रसन्ना गौतम पुढे म्हणाले की, बस क्रमांक 9463 हिने प्रवाशांना घेतले आणि सिद्धार्थ नगर येथून पोखरा मार्गे भारत-नेपाळ सीमा ओलांडत लखनौ, आग्रा मार्गे दिल्लीला पोहोचली. त्या दिवशी बसमध्ये सुमारे 37 लोक प्रवास करत होते. 'सीमेवर चेकिंग होते, तिथे काय झाले ते माहिती नाही. आम्ही म्हणतो की फक्त नेपाळी नागरिक असावेत. तिने आम्हाला भारतीय असल्याचे सांगितले. आमच्याकडे परमिट फक्त भारतीय आणि नेपाळी नागरिकांची वाहतूक करण्यासाठीचे आहे.

07
त्या बसचा चालक राजू अधिकारी हा भारतात आहे. तसेच दिल्लीतील सरोजिनी नगर येथे त्यांचे कार्यालय आहे. राजू अधिकारी गेल्या 4 दिवसांपासून तेथेच असून, त्याची चौकशी करण्यात आली आहे. "काय चौकशी केली जात आहे, हे मला माहित नाही, परंतु तो भारतातच आहे.", असे ते म्हणाले.

  • FIRST PUBLISHED :
  • न्यूज 18 इंडियाला मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात प्रवेश करण्यासाठी सीमा ही विविध ठिकाणी खोटं बोलली. सीमा आणि तिचा प्रियकर सचिन यांनी हॉटेल न्यू विनायक, काठमांडू, नेपाळ येथे खोटे नाव आणि पत्ता नोंदवला होता. तसेच सीमा ज्या बसमधून 12 मे रोजी भारतात दाखल झाली, त्या बसच्या व्यवस्थापकालाही तिने आपली खरी ओळख लपवून खोटी माहिती दिली.

    MORE
    GALLERIES