guwahati accident
Road Accident : काळ कधी कुठे कसा येईल याचा काही नेम नसते. मात्र छोटी चूक खूप जास्त महागात पडू शकते. 7 इंजिनियर विद्यार्थ्यांना मृत्यूनं गाठलं आणि भयंकर प्रकार घडला. गाडीने जात असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला. आधी कार दुभाजकावर आदळली आणि नंतर दुसऱ्या गाडीला धडक दिली आहे. या गाडीचा वेळ खूप जास्त असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गुवाहाटी येथील जलुकबारी येथील डीसीपी कार्यालयासमोर मध्यरात्री भयंकर अपघात झाला. हा अपघात ज्यांनी पाहिला ते ही रात्र कधीच विसरू शकणार नाहीत अशी स्थिती रस्त्यावर होती. भरधाव वेगात असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने ब्रॉयलर घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिली. या अपघातात 7 इंजिनियर विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाव्या सत्रला हे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. वसतिगृह क्रमांक २ मधील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
कारने दोघांना चिरडलं, पण त्यानंतर जे घडलं ते यापेक्षाही धक्कादायक; Shocking Video Viralनिओर डेका, उपांशु शर्मा, कौशिक बरुआ, कौशिक मोहन, राज किरण भुइयां, एमोन बरुआ, अरिंदम भौवाल अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. तर या अपघातात इतर 6 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मृण्मय बोरा, अर्नव चक्रवर्ती आणि अर्पण भुइयां घायल अशी जखमी विद्यार्थ्यांची नावं आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर मृतदेह ताब्यात घेतले असून रुग्णालयात शवविच्छेदन अहवालासाठी पाठवून देण्यात आलं आहे.
हायवेवर गाडीतून पडले दारूचे बॉक्स; बेवड्यांसोबत लहान मुले, महिलांनीही लांबवल्या बाटल्यास्कॉर्पिओ वाहनाचा वेग जास्त होता. आधी या गाडीने दुभाजकाला धडक दिली. हा वेग नियंत्रणात न आल्याने गाडी पुढे गेली आणि दुसऱ्या लेनमधून जाणाऱ्या पिकअप वाहनावर आदळली. या अपघातानंतर साधारण दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. हळूहळू वाहतूक पूर्वपदावर करण्यात आली आहे.