जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हायवेवर गाडीतून पडले दारूचे बॉक्स; बेवड्यांसोबत लहान मुले, महिलांनीही लांबवल्या बाटल्या

हायवेवर गाडीतून पडले दारूचे बॉक्स; बेवड्यांसोबत लहान मुले, महिलांनीही लांबवल्या बाटल्या

तळीरामांची बाटल्या लांबवण्यासाठी झुंबड

तळीरामांची बाटल्या लांबवण्यासाठी झुंबड

येवल्यात पुणे-इंदौर मार्गावरून दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या वाहनातून काही बॉक्स खाली पडल्यानंतर तळीरामांची बाटल्या लांबवण्यासाठी एकच झुंबड उडाली.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

बब्बू शेख, प्रतिनिधी नाशिक, 28 मे : तळीरामांना दारू पिण्यासाठी निमित्त लागत नाही. अगदी दारूबंदी असलेल्या गावातही ढिगाने पिणारे सापडतील. अशात जर रस्त्यावर फुटक दारू मिळत असेल तर ही सुवर्णसंधी कोण सोडेल? मात्र, तळीरामांसोबत त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना मदत करत असल्याचे सांगितले तर खचितच तुमचा विश्वास बसेल. मात्र, ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. पुणे-इंदौर मार्गावरून दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या वाहनातून काही बॉक्स खाली पडल्यानंतर दारूच्या बाटल्या लंपास करण्यासाठी तळीरामाची झुंबड उडाल्याची घटना येवल्यात घडली. धक्कादायक म्हणजे दारूच्या बाटल्या लंपास करण्यामध्ये लहान मुली, मुले आणि महिलांचा देखील समावेश होता.

जाहिरात

काय आहे घटना? पुणे-इंदौर मार्गावरून दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या वाहनातून काही बॉक्स खाली कोसळले. अचानक रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा खच झाला. यातील काही बाटल्या फुटल्यामुळे रस्त्यावर काचा पसरल्या होत्या. मात्र, फुटक दारू मिळत असल्याने अनेकांना काचांचा विसर पडल्याचे पाहायला मिळाले. बाटल्या लंपास करण्यासाठी तळीरामाची एकच झुंबड उडाली. धक्कादायक म्हणजे दारूच्या बाटल्या पळवणाऱ्यांमध्ये लहान मुली, मुले आणि महिलांचा देखील समावेश होता. महामार्गावरून धावणाऱ्या एखादा वाहनाखाली येऊन अपघात होऊ शकतो याची देखील कोणी फिकीर करत नव्हते. हातात मिळेल तेवढ्या बाटल्या या तळीरामांनी लंपास केल्या. वाचा - बायको नांदायला येण्यासाठी घातला देवीचा गोंधळ; परिणाम न झाल्याने भगतासोबत केलं कांड समृद्धी महामार्गावर ट्रक पलटी झाल्यानंतर बेवडे सुस्साट काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर महाबळा शिवारात बियरचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकला निलगाय आडवी आल्याने चालकाने ब्रेक मारला असता ट्रक झाला पलटी झाली. ट्रकमध्ये कोपन व्हेग कंपनीच्या बिअरच्या बॉटलचे पंधराशे बॉक्स होते. औरंगाबाद एमआयडीसी इथून नागपूरच्या वाडी इथल्या लावा गोडावूनला बिअर बॉक्स घेऊन जात असताना हा अपघात झाला. ट्रक समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या लेनवर पलटल्याने बिअरच्या बॉटलचा चक्काचूर झाला. ट्रकला अपघात झाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकची पाहणी केली असता आतमध्ये बिअरचे बॉक्स आहे, अशी माहिती मिळली. मग, काय बघता बघता बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावातील तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी अपघातग्रस्त बिअरच्या ट्रकवर हल्ला चढवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात