JOIN US
मराठी बातम्या / देश / हंटर क्वीनला स्टंटबाजी भोवली; आता पोलिसांकडून मिळणार प्रसाद!

हंटर क्वीनला स्टंटबाजी भोवली; आता पोलिसांकडून मिळणार प्रसाद!

हंटर क्वीनचे इंस्टाग्रामवर 1.76 लाख फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्स आणखी वाढवण्यासाठी, लाखो लाइक्स मिळवण्यासाठी ती असे रील बनवते.

जाहिरात

एका रीलमध्ये तिने बाइक चालवताना हातात चक्क बंदूक घेतली आहे, दोन्ही हात सोडून ती बंदूक हाताळताना दिसतेय.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सच्चिदानंद, प्रतिनिधी पाटणा, 17 जुलै : बिहारच्या अटल पथ आणि गंगा पथ-वे (मरीन ड्राइव्ह)वर वाढलेली स्टंटबाजी रोखण्यासाठी पोलीस तैनात असतात. मात्र तरीही स्टंटबाजीवर लगाम बसलेला नाही. काहीजण तर सोशल मीडियावर मिळणाऱ्या काहीशा व्ह्यूज आणि लाइकसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. अशाच एका हंटर क्वीनला हात सोडून बाइक चालवणं चांगलंच भोवलं आहे. आता पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. हंटर क्वीन या नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट असलेली ही मुलगी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून खतरनाक बाइक स्टंट पोस्ट करत असते. तिच्या डोक्यावर हेल्मेटही नसतं, जे तिच्यासह इतरांच्याही जीवावर बेतू शकतं. एका रीलमध्ये तिने बाइक चालवताना हातात चक्क बंदूक घेतली आहे, दोन्ही हात सोडून ती बंदूक हाताळताना दिसतेय. या मुलीचा व्हिडिओ बिहार पोलिसांच्या नजरेस पडताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिचा शोध सुरू केला आहे.

हंटर क्वीनचे इंस्टाग्रामवर 1.76 लाख फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्स आणखी वाढवण्यासाठी, लाखो लाइक्स मिळवण्यासाठी ती असे रील बनवते. पाटणाच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबत सांगितलं की, एक तरुणी स्टंट करून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करते. याबाबत सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून गुन्हा दाखल केला जाईल. सीमा हैदरच्या घरी रात्री अचानक आले पोलीस! का लागला दरवाजा उघडायला वेळ? दरम्यान, कोणीही अशाप्रकारचं कृत्य करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. तसेच पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या