WHO
नवी दिल्ली : कोरोना पूर्णपणे अजूनही बरा झाला नाही. कोरोनाचा धोका कमी झाला नाही असं असतानाही आता WHO ने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. तो कोरोना किंवा लम्पीचा नाही तर यापेक्षाही भयंकर व्हायरस येऊ शकतो आणि त्यासाठी जगानं तयार राहायला हवं असं म्हटलं आहे. याआधी आणखी एक साथीचा इशारा देण्यात आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी इशारा दिला आहे. जगाने पुढच्या साथीच्या रोगासाठी तयार राहायला हवं. जो कोविड-19 साथीच्या आजारापेक्षा जास्त घातक असू शकतो.
Morning Tea : चहा सोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणामWHO च्या प्रमुखांनी 76 व्या जागतिक आरोग्य संमेलनात आपला अहवाल सादर करताना हे सांगितले. ते म्हणाले की कोरोनामुळे किमान 20 मिलियन लोकांचा मृत्यू झाला. आता जरी आणीबाणीचा काळ नसला तरीसुद्धा पूर्णपणे कोरोनाचा धोका टळलेला नाही.
Fitness Tips: बडीशेपच पाणी लठ्ठपणा कमी करण्यावर रामबाण उपाय, जाणून घ्या रेसिपीकोरोनाचे विषाणू आपलं रुप बदलत आहेत. त्यामुळे यापेक्षा ते अधिक घातक होऊ शकतात. कोरोनामुळे एक छोटा विषाणू किती भयानक असू शकतो याची संपूर्ण जगाला कल्पना आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाने अशा प्रकारचा आजाराशी लढण्यासाठी तयार राहायला हवं असं म्हटलं आहे.