चहा आणि बेसन पिठाचे पदार्थ : अनेकांना चहा सोबत गरमागरम भजी खाण खूपच आवडतं. हे समीकरण जरी चविष्ठ असलं तरी हे आपल्या आरोग्यासाठी फार घातक ठरू शकत. चहा सोबत बेसनाचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपली पचनशक्ती कमकुवत होऊ शकते. चहासोबत बेसन पिठात बनवलेले आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराच्या पचन तंत्रावर ताण येतो त्यामुळे शरीराची पोषक तत्वे शोषून घेण्याची क्षमताही कमी होते. म्हणून चहा सोबत बेसन पिठाचे आणि तळलेले पदार्थ खाण टाळावं.
चहा आणि लिंबू : वजन कमी करण्यासाठी अनेकजण चहात लिंबू पिळून त्याचे सेवन करतात परंतु असे करण आरोग्यासाठी चांगलं नाही. कारण चहामध्ये लिंबाचा रस मिसळल्यास तो चहा ऍसिडिक बनतो. सकाळी रिकाम्या पोटी लिंबाचा रस टाकलेला चहा प्यायल्यास अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे लिंबाचा रस टाकलेला चहा पिणं टाळावं.
चहा आणि पाणी : चहा ही पाण्यापासूनच बनत असली तरी चहा घेतल्यानंतर कधीही लगेच पाणी पिऊ नये. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया कमकुवत होते तसेच पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या पडण्यास सुरूवात होते. तसेच चहा प्यायल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाऊ नये. गरम चहानंतर किमान ३० मिनिट थंड पदार्थ खाण टाळावे.
चहा आणि सुकामेवा : अनेकजण सकाळी चहा सोबतच सुकामेवा खातात. परंतु असे करणे आरोग्यास घातक ठरू शकते. सुकामेव्यात भरपूर लोहाचे प्रमाण असते, त्यामुळे चहासोबत सुकामेवा खाल्ल्यास आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतो. चहामध्ये टॅनिन नावाचे संयुग असते जे सुकामेव्यासोबत घेतल्यास ते शरीरातील पोषक तत्वांचे शोषण रोखू शकते.
चहा आणि बिस्कीट : चहा सोबत आपण बिस्कीट तसेच बेकरीचे पदार्थ सर्रास खात असतो. परंतु सकाळी चहा सोबत हे पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले नाहीत. सकाळी शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी पोषक खाद्याची आवश्यकता असते. तेव्हा चहा प्यायल्यानंतर चांगली न्याहारी करावी, तसेच बिस्कीट आणि बेकरीच्या पदार्थांमध्ये मीठ आणि मैद्याच्या प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याचे चहा सोबत केलेले सेवन आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.