JOIN US
मराठी बातम्या / देश / अरेच्चा! 500 रुपयांसाठी पठ्याने एटीएम मशीनच फोडलं? असं काय घडलं?

अरेच्चा! 500 रुपयांसाठी पठ्याने एटीएम मशीनच फोडलं? असं काय घडलं?

केवळ 500 रुपयांसाठी हे कृत्य केल्याचं कळलं. मात्र सीसीटीव्हीमधून काहीतरी वेगळंच समोर आलं.

जाहिरात

आपण चोरी करण्यासाठी एटीएम फोडलं असं वाटू शकतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पतनमतिट्टा, 26 जून : एटीएम फोडल्याच्या बातम्या ठिकठिकाणाहून कानावर येतात. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा चोरट्यांना पकडलं जातं. केरळमध्ये तर चक्क 500 रुपयांसाठी एटीएम मशीनच्या तोडफोडीचं प्रकरण समोर आलं आहे. केरळच्या पतनमतिट्टा जिल्ह्यात ही घटना घडली. रविवारी सकाळी फेडरल बँकेचं एटीएम फोडलेलं पाहून लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. याबाबत तक्रार केल्यानंतर केवळ 500 रुपयांसाठी हे कृत्य केल्याचं कळलं. मात्र सीसीटीव्हीमधून काहीतरी वेगळंच समोर आलं.

त्याचं झालं असं की, चार्ली हे रविवारी सकाळी 500 रुपये काढण्यासाठी एटीएममध्ये गेले होते. पैसे बाहेर येण्याची वाट ते पाहत होते, मात्र त्याचं कार्डही बाहेर येत नव्हतं. त्यांनी जोर लावून कार्ड बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्ड काही येईना. अखेर त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यानंतर कार्डसह मशीनचं पुढचं कव्हरही बाहेर आलं. मशीन पूर्णपणे तुटलं. तेव्हा चार्ली घाबरले. Satyaprem Ki Katha: रिलीजपूर्वीच वादात अडकला कार्तिक-कियाराचा ‘सत्य प्रेम की कथा’; ‘या’ कारणामुळे होतोय विरोध ‘आपण चोरी करण्यासाठी एटीएम फोडलं असं वाटू शकतं’, असा विचार त्यांच्या मनात आला. म्हणून त्यांनी बाहेर पडून पहिल्या दिसलेल्या माणसाला म्हणजेच एका लॉटरीवाल्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि याबाबत पुढे काही अडचण निर्माण झाली, तर साक्षीदार म्हणून उभं राहण्याची मदतही मागितली. दरम्यान, हा सर्व प्रकार लक्षात घेऊन आपण सर्वांनीही एटीएममधून पैसे काढताना काळजी घ्यायला हवी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या