बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा 'सत्य प्रेम की कथा' हा चित्रपट रिलीज होण्याआधीच तो वादात सापडला आहे.
कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा 'सत्य प्रेम की कथा' हा चित्रपट पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याला कारण आहे 'सत्य प्रेम की कथा' चित्रपटातील 'पसुरी'.
चित्रपटाचं हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर या गाण्याला जोरदार विरोध होत आहे. 'पसुरी'च्या रिमिक्सवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.
हे गाणे कोक स्टुडिओ पाकिस्तानच्या 'पसूरी' या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन आहे. मुळात 'पसूरी' गाणे अली सेठी आणि शाये गिल यांनी गायले आहे.
मूळ पंजाबी भाषेत असलेलं हे गाणं भारतात देखील खूप लोकप्रिय झालं होतं. पण आता या गाण्याचं हिंदी रिमिक्स व्हर्जन ऐकून नेटकरी संतापले आहेत.
अशा परिस्थितीत आता 'पसूरी' या गाण्याला विरोध झाल्याने चित्रपटाच्या कमाईवर काय परिणाम होतो हे पाहावे लागेल.