JOIN US
मराठी बातम्या / देश / 80 टक्के दिव्यांग, तरी सोडली नाही जिद्द! वर्ल्ड रेकॉर्डला घातली गवसणी

80 टक्के दिव्यांग, तरी सोडली नाही जिद्द! वर्ल्ड रेकॉर्डला घातली गवसणी

5 हजार फूट उंच 42 किलोमीटरचा प्रवास त्यांना पार करायचा होता. मात्र याबाबत जराही भीती न बाळगता कडाक्याच्या थंडीत त्यांनी लेह लडाखचा खारदुंगला पर्वत बाइकवरून सर केला.

जाहिरात

त्यांनी तब्बल 123 पदव्या, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र कोर्स संपादित केले आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

निशा राठोड, प्रतिनिधी उदयपूर, 19 जुलै : जिद्द असेल तर कोणताही खडतर मार्ग सहज पार करता येतो, असं म्हटलं जातं. ज्याची अनेक उदाहरणं आजकाल पाहायला मिळतात. उदयपूरमधील एका 80 टक्के दिव्यांग व्यक्तीने तर चक्क लडाखच्या पर्वतांना जोडणारा भलामोठा मार्ग पार करण्याचा विश्वविक्रम केला आहे. डॉ. अरविंदर सिंह यांनी हा पराक्रम केला असून याबाबत लडाखच्या राज्यपालांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आलं. डॉ. अरविंदर हे उदयपूरच्या अर्थ ग्रुपचे सीईओ आणि सीएमडी आहेत. अरविंदर यांनी प्रचंड आत्मविश्वासाने 13 जुलै रोजी हा खडतर प्रवास सुरू केला होता. 5 हजार फूट उंचीवर 42 किलोमीटरचा प्रवास त्यांना पार करायचा होता. मात्र याबाबत जराही भीती न बाळगता कडाक्याच्या थंडीत त्यांनी लेह लडाखचा खारदुंगला मार्ग बाइकवरून पार केला.

राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी ट्विटरवरून अरविंदर यांना शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं. त्याचबरोबर विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, अरविंदर यांनी हे यश माझ्या एकट्याचं नसून यामध्ये सर्व दिव्यांग व्यक्तींचा वाटा आहे, असं म्हटलं. सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण असल्याचंही ते म्हणाले. कोटींमध्ये विकला जातो ‘हा’ साप; आंतरराष्ट्रीय बाजारात आहे मोठा दरारा महत्त्वाचं म्हणजे डॉ. अरविंदर यांनी तब्बल 123 पदव्या, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र कोर्स संपादित केले आहेत. मालदीवमध्ये यशस्वीरीत्या स्कूबा डायव्हिंग करणारे ते पहिले दिव्यांग व्यक्ती आहेत. त्याचबरोबर पॅरा प्रकारात पिस्तूल नेमबाजतही राज्यीय स्तरावर त्यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या