अंकित कुमार सिंह, प्रतिनिधी सिवान, 19 जुलै : सापासाठी कधी लाखो रुपये मोजल्याचं ऐकलंय? सापांच्या अशा अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत, ज्यांना लाखोंची मागणी असते. रेड सँड बोआ म्हणजे मांडूळ या एका सापासाठी विदेशात कोट्यवधी रुपये मोजले जातात. तर भारतात काही लाखांमध्ये त्याची विक्री होते. प्रामुख्याने राजस्थानच्या काही भागांमध्ये हा साप पाहायला मिळतो. त्यामुळे इतर ठिकाणी मांडूळ दिसल्यास आश्चर्य व्यक्त केलं जातं. अलीकडेच बिहारच्या सिवान जिल्ह्यात मांडूळ आढळला होता. काळ्या जादूसारख्या अंधश्रद्धेच्या प्रकारांमध्ये मांडुळाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे सर्वधर्मीय लोक या सापासाठी अंधविश्वासापोटी भलीमोठी रक्कम द्यायला तयार होतात. परिणामी त्याची तस्करीही मोठ्या प्रमाणात होते. हे अवैध व्यवहार रोखण्यासाठी मांडुळाला कायदेशीर संरक्षणही देण्यात आलं आहे.
बिहार, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाणात मांडुळाच्या तस्करीचं प्रमाण अधिक आहे. या सापाबद्दल आश्चर्यकारक माहिती म्हणजे त्याला दोन तोंडी म्हटलं जात असलं, तरी त्याला एकच तोंड असतं. मात्र त्याचं शेपूटही तोंडांसारखं दिसतं म्हणून त्याला दोन तोंडी साप म्हणतात. पुन्हा ज्योती मौर्य! नवऱ्याने जमीन विकून शिकवलं; बायकोने नोकरी मिळताच… आजूबाजूला कोणताही धोका जाणवला की, मांडूळ त्याचं शेपूट अगदी तोंडासारखं उघडतो. दरम्यान, मांडुळाबाबत जगभरात विविध अंधश्रद्धा मानल्या जातात, त्यामुळेच या प्रजातीचं अस्तित्त्व सध्या धोक्यात आहे. भारत सरकारने 1972 साली मांडुळासह इतर काही पाच वन्यजीवांना संरक्षित श्रेणीत समाविष्ट केलं होतं.