JOIN US
मराठी बातम्या / देश / आई गं! आईची साडीच लेकीसाठी बनली काळ; 12 वर्षीय मुलीचा तडफडून गेला जीव

आई गं! आईची साडीच लेकीसाठी बनली काळ; 12 वर्षीय मुलीचा तडफडून गेला जीव

आईच्या ज्या साडीवर मुलगी खेळत होती, त्याच साडीने तिचा जीव घेतला.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

निखिल मित्रा/15 मार्च, रायपूर : प्रत्येक मूल लहान असताना आपल्या आईच्या पदरामागे दडतं, ऊन असो वा पाऊस आई आपल्या साडी च्या पदराखाली आपल्या मुलांना सुरक्षित ठेवते. मोठं झाल्यानंतरही आईची साडी कित्येकांसाठी विशेषतः मुलीं साठी खूप खास असते. अशीच मायेची आईची साडी एका लेकीसाठी जीवघेणी ठरली. आईच्या साडीमुळे एका 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगढच्या अंबिकापूरमधील ही घटना आहे. सूरजपूरच्या परशुरामपूर गावात राहणारी ही 12 वर्षांची मुलगी रितिका. घरातील झोपाळ्यावर झोके घेत होती. काही वेळाने झोपाळ्यावरच ती लटकलेली दिसली. ती बेशुद्ध झाली होती. तिच्या भावाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तो घाबरला. त्यावेळी रितिकाचे आईवडील शेतात काम करायला गेले होते. तिच्या भावाने लगेच शेताकडे धाव घेतली. नागपूर - आईच्या पोटातच अडकलं बाळ; शरीराबाहेर येईपर्यंत गेली 15 वर्षे, झाली अशी अवस्था रितिकाच्या भावाने आपल्या आईबाबांना तिच्या अवस्थेबाबत सांगितलं. सर्वजण शेतातून धावत घरी आले.सुरुवातीला तिला जवळच्या श्रीनगर आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. तिथून तिला रामानुजनगर रुग्णालयात पाठवण्यात आलं. पण तिची प्रकृती खूप गंभीर होती. तिची अवस्था पाहतात तिथूनही तिला अंबिकापूर मेडिकल रुग्णालयात पाठवलं गेलं. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित कलं.  पोस्टमॉर्टेमनंतर तिचा मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

रितिकाचे वडील सुरदीर सिंह म्हणाले, माझी 12 वर्षांची मुलगी रितिका ज्या झोपाळ्यावर झुलत होती, तो साडीचा होता. झोका घेताना तिच्या मानेत साडीचा फास अडकला. होळी खेळल्यानंतर एकत्र अंघोळीला गेले नवरा-बायको, बाथरूममध्येच मृत्यू; धक्कादायक कारण घरात आईच्या साडीचा झोपाळा बांधला होता. या झोपाळ्यावरच रितिका झुलत होती. हाच साडीचा झोका तिच्या गळ्याचा फास बनला. ती घुसमटली, तिचा श्वास कोंडला, ती बेशुद्ध झाली आणि शेवटी तिचा जीव गेला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या