जाहिरात
मराठी बातम्या / देश / होळी खेळल्यानंतर एकत्र अंघोळीला गेले नवरा-बायको, बाथरूममध्येच मृत्यू; धक्कादायक कारण

होळी खेळल्यानंतर एकत्र अंघोळीला गेले नवरा-बायको, बाथरूममध्येच मृत्यू; धक्कादायक कारण

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

होळी खेळल्यानंतर अंघोळीला गेलेल्या कपल बेशुद्धावस्थेत पडलं होतं, रुग्णालयात नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 09 मार्च : दीपक गोयल आणि त्याची पत्नी शिल्पी आपल्या दोन मुलांसह होळी खेळले. होळी खेळल्यानंतर दोघंही संध्याकाळी अंघोळीला गेले. पण बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेलेल्या या दाम्पत्यासोबत भयंकर घडलं. त्यांचा बाथरूममध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 40 वर्षांचा दीपक आणि 36 वर्षांची शिल्पी दोघंही आपल्या दोन मुलांसह मुरादनगरमधील अग्रसेन कॉलनी फेस-वनमध्ये राहत होते. बुधवारी होळी खेळल्यानंतर संध्याकाळी चारच्या सुमारास ते बाथरूरममध्ये अंघोळ करायला गेले. त्यांना अंघोळीला बाथरूममध्ये जाऊन एक तास झाला होता. तरी दोघंही बाहेर आलेच नव्हते, आतूनही काही आवाज येत नव्हता. तेव्हा त्यांच्या मुलांनी शेजाऱ्यांना सांगितलं. प्रयत्न करूनही मरण येईना! पोटच्या 5 लेकरांच्या हत्येनंतर स्वतःच्या मृत्यूसाठी तडफडत राहिली आई शेजाऱ्यांनी व्हेंटिलेशनची काच तोडून बाथरूममध्ये गेले. तेव्हा दोघंही जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली.

News18लोकमत
News18लोकमत

पोलिसांच्या मते, गॅस गिझरमुळे श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला आहे. कारण बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नव्हतं. बाथरूममध्ये सिलेंडर आणि गिझरही मिळाला. इंडिया डॉट कॉमच्या वृत्ता नुसार एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की जेव्हा ते तपासासाठी बाथरूममध्ये गेले तेव्हा त्यांना कोंडल्यासारखं वाटू लागलं. सिलेंडर आणि गॅस गिझर आतच होता. नीट व्हेंटिलेशनचीही सोय नव्हती. व्हेंटिलेशनसाठी दरवाजाच्या वर काच लावली होती, ती बंद होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू श्वास कोंडून झाला असण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत. गॅस गिझर वापरताना काय काळजी घ्यायची? गॅस गिझरमध्ये एलपीजीचा वापर होतो. गिझरमुळे कार्बन मोनोऑक्साइड आणि नाइट्रो ऑक्साइड असे हानिकारक गॅस बनतात. या गॅसचं प्रमाण बाथरूममध्ये वाढल्यास लोक बेशुद्ध होतात. जास्त वेळ गिझर चालू राहिल्यास बंद बाथरूममध्ये श्वास कोंडतो आणि काही वेळात मृत्यू होतो. लवकरात लवकर उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो, असं डॉक्टरांनी सांगितलं. इंडियन तरुणासोबत लग्नासाठी सोडला देश, भारतात येताच इराणी तरुणीचा मृत्यू; धक्कादायक कारण 1) गॅस गिझर आणि सिलेंडेर दोन्ही बाथरूमच्या बाहेरच असावे. पाणी पाइपने बाथरूममच्या आत घेता येऊ शकतं. 2) बाथरूममचा दरवाजा बंद कऱण्याआधी बादलीत गरम पाणी भरून घ्या. 3) गिझर बंद केल्यानंतरच अंघोळ करा. 4) बाथरूममध्ये क्रॉस व्हेंटेलिशन असेल याची खबरदारी घ्या. 5) एक जण अंघोळ करून आल्यानंतर लगेच बाथरूममध्ये जाऊ नका, काही वेळ दरवाजा उघडा राहू द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात