जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर - आईच्या पोटातच अडकलं बाळ; शरीराबाहेर येईपर्यंत गेली 15 वर्षे, झाली अशी अवस्था

नागपूर - आईच्या पोटातच अडकलं बाळ; शरीराबाहेर येईपर्यंत गेली 15 वर्षे, झाली अशी अवस्था

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

नागपुरातील महिलेच्या पोटात 15 वर्षे बाळ होतं, पण ती प्रेग्नंट आहे याची माहिती तिलाही नव्हती.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 15 मार्च : सामान्यपणे प्रेग्नन्सी 9 महिन्यांची असते. प्रसूतीच्या मुदतीआधीही काही बाळ जन्माला येतात. त्यांना प्रिमॅच्युअर बेबी म्हणतात. प्रसूतीसाठी तसा 9 महिन्यांनंतर फार फार तर काही दिवस पुढे जातील. पण हा कालावधी 15 वर्षांचाही असेल असा तुम्ही कधी विचार तरी केला का? प्रेग्नन्सीचं असंच एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. नागपुरातील एक महिला तब्बल 15 वर्षे प्रेग्नंट होती. धक्कादायक म्हणजे ती प्रेग्नंट आहे याची माहिती तिलाही नव्हती. 15 वर्षे तिच्या पोटात बाळ होतं. इतकी वर्षे आईच्या पोटात राहणाऱ्या या बाळाची अवस्था भयानक झाली. नागपुरातील महिला जिला गेल्या तीन वर्षांपासून सलग उलट्या होत होत्या. तिच्या पोटात वेदनाही होत होत्या. ती डॉक्टरांकडे जायची. डॉक्टर तिला पेनकिलर आणि गॅसच्या समस्येतून आराम देणारी औषधं द्यायचे. पण ही औषधं घेऊनही तिच्यात काहीच फरक पडला नाही. उलट्या आणि पोटदुखी सुरूच होती. अखेरच ती नर्सिंग होममध्ये गेली. तिथं तिचं सिटी स्कॅन करण्यात आलं. तेव्हा जे दिसलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. रिअल लाइफ बधाई हो! आईबाबांनी दिली Good news, 23 वर्षांच्या लेकीला वाटली लाज, बाळाचा जन्म होताच… तिच्या आतड्यांमध्ये काहीतरी अडकल्याचं दिसलं. तिची लॅप्रोस्कोपी करण्यात आली तेव्हा ते एक बाळ असल्याचं समजलं. चार महिन्याचं हे बाळ. या प्रकरणामुळे डॉक्टरही शॉक झाले कारण हे खूपच दुर्मिळ प्रकरण होतं. माहितीनुसार महिला 15 वर्षांपूर्वी प्रेग्नंट झाली होती. पण गर्भ राहिल्यानंतर तिने गर्भपात केला होता कारण ती बाळासाठी तयार नव्हती. पण गर्भपात झालाच नाही ते बाळ महिलेच्या आतड्यांमध्येच अडकलं.

News18लोकमत
News18लोकमत

या महिलेचं तात्काळ ऑपरेशन करण्यात आलं. तब्बल दोन तास सर्जरी चालली. तब्बल 15 वर्षे आईच्या पोटात अडकलेलं हे बाळ आईच्या शरीरातून अखेर बाहेर आलं. पण जन्मापर्यंत त्याची भयानक अवस्था झाली होती. त्याचा जन्म तर झाला पण तोपर्यंत त्या बाळाचा दगड झाला होता. तुम्हाला माहिती आहे का? बायकोच्या प्रेग्नन्सीवेळी नवराही असतो ‘प्रेग्नंट’; दिसतात अशी लक्षणं याला स्टोन बेबी म्हणतात.  वैद्यकीय भाषेत स्टोन बेबीला लिथोपीडियन म्हणतात. गेल्या 400 वर्षांत स्टोन बेबीची 300  प्रकरणं समोर आली आहेत. गर्भपाताची 11 हजार प्रकरणात असं होतं की बाळ शरीरात कुठेतरी अडकतं. नागपुरातील ही घटना 2017 सालातील आहे. ज्या महिलेसोबत हे घडलं ती आता ठिक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात