JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / वास्तुशांतीच्या महाप्रसादातून विषबाधा, 3 मुलांचा मृत्यू, 25 जणांची प्रकृती गंभीर

वास्तुशांतीच्या महाप्रसादातून विषबाधा, 3 मुलांचा मृत्यू, 25 जणांची प्रकृती गंभीर

रायगडमधील महड येथे पुजेतील जेवणातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रायगड, 19 जून : रायगडमधील महड येथे पुजेतील जेवणातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पनवेलमध्ये रुग्णालयात उपचार सुरु आहे. खालापूर तालुक्यातील महड येथील माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पुजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटपून स्वगृही परतलेल्यांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला. ५० ते ६० जणांना विषबाधा झाल्याचे वृत्त असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत ३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पनवेलमधील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या जेवणातून विषबाधा होण्यामागचं नक्की कारण काय आहे याचा आता पोलीस तपास घेत आहेत. पण या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

हेही वाचा…

दोघे वाचले तिसरा लाटेत गेला वाहून,थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

VIDEO : ईद मुबारक हो!,तरूणीची गळाभेट घेण्यासाठी तरुणांची लागली रांग

फक्त 20 रूपयांसाठी रिक्षाचालकाने घेतला प्रवाशाचा जीव

शिवसेना शाखा प्रमुखाकडूनच नगरसेवकावर धारधार शस्त्राने हल्ला

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या