मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं
उदय जाधव, प्रतिनिधी मुंबई, 16 जुलै : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतरचं राज्य सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ‘नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी दिलेलं पत्र पाहता अंतिम आठवड्याचा प्रस्ताव दिसतोय. विरोधकांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. दादांच्या सहकार्याने त्यांची ही परिस्थिती दिसत आहे. शेवटी संख्याबळाला महत्त्व असते, 200 पेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे. विरोधी पक्षाकडून सर्वसामान्यांचे प्रश्न अपेक्षित असतात, पण ते दिसले नाहीत. आम्ही तिघेही विरोधी पक्षनेते होतो, आम्ही विरोधाला विरोध केला नाही,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ‘घोडा मैदान काही लांब नाही’, राष्ट्रवादीच्या व्हीपवर अजित पवारांची सूचक रिएक्शन ‘विरोधी पक्ष आता कुठे आहे, हे शोधावं लागेल. दररोज सकाळी सरकार पडेल म्हणून म्हणतात, पण सरकार काही पडलं नाही, उलट ते आणखी मजबूत झालं आहे. सरकार म्हणून आता आमची जबाबदारी आहे, विरोधी पक्ष कितीही कमकूवत असला तरी त्यांना दुय्यम स्थान देणार नाही. साहेबांनी आम्हाला चांगल्याला चांगलं म्हणायला शिकवलं आहे. आम्ही चांगलं काम करू, कुणालाही तक्रार करायला जागा ठेवणार नाही. जे प्रश्न येतील त्याला संबंधित मंत्री उत्तर देऊन न्याय देतील,’ असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ‘पावसाची चिंता आम्हालाही आहे, काही प्रमाणात पाऊस झालेला नाही. शेवटी निसर्ग आहे, लहरीप्रमाणे अतिवृष्टी गारपीट होत आहे, मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हा शब्द आहे. आजच्या कॅबिनेटमध्येही आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ‘भेट घेतली तर…’, अजित पवार-शरद पवार भेटीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया