चक्रीवादळाचा परिणाम
मुंबई : मोचा चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. एकीकडे वाढणारा उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत. पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे. मोचा चक्रीवादळामुळे हवामान बदलत आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. Cyclone Mocha Interesting Facts : देशावर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाला मोचा हे नाव कसं पडलं? विदर्भ आणि छत्तीसगड भागात आज मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अवकाळी पावसानं अतोनात पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगाल उपसागर, द.अंदमान समुद्रात ८ मे ला कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. तर ९मे पर्यंत ते अजून तीव्र (depression) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन बंगाल उपसागरात उत्तरेकडे प्रवास सुरू होईल. अंदमान,निकोबारला ८-१२ मे मुसळधार-अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
समुद्र या कालावधीमध्ये अधिक खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांना आणि पर्यटकांनाही समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा दिला आहे. ओडिशाला याचा जास्त धोका असल्याने प्रशासन अलर्टवर आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मोचा चक्रीवादळाचा धोका, कसं ठरवलं जातं चक्रीवादळाचं नाव?हवामान खात्याने यापूर्वीच जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसाठी वादळ आणि पावसाबद्दल यलो अलर्ट जारी केला होता. तर दिल्ली-एनसीआरमध्येही वादळ आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत असून मे महिन्याच्या कडक उष्णतेऐवजी आल्हाददायक वातावरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.