जाहिरात
मराठी बातम्या / देश / Cyclone Mocha Interesting Facts : देशावर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाला मोचा हे नाव कसं पडलं?

Cyclone Mocha Interesting Facts : देशावर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाला मोचा हे नाव कसं पडलं?

चक्रीवादळ अपडेट

चक्रीवादळ अपडेट

Cyclone Mocha चक्रीवादळाला मोचा हे नाव कोणी दिलं? त्याचा नावामागे रंजक कहाणी तुम्हाला माहिती आहे का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली : संपूर्ण देशातील वातावरण सध्या बिघडलेलं आहे. कुठे अति ऊन तर कुठे धो धो पाऊस तर कुठे बर्फवृष्टी हे सगळे बदल आणि त्यात आता देशावर चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. या वर्षातलं पहिलं चक्रीवादळ 6 मे ते 8 मे या काळात धडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे परिणाम समुद्र किनारपट्टीलगच्या भागात तीव्र तर बाकीच्या राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ किंवा वादळ येणार आणि त्याला दिलेलं जे नाव आहे ते कसं ठरवलं जातं असा कधी विचार केला आहे का? चक्रीवादळाची वेगवेगळी नाव कुठून आली. प्रत्येक नावामागे एक रंजक गोष्ट आहे. 6 मे रोजी येणाऱ्या चक्रीवादळालाही नाव देण्यात आलं आहे. मोचा असं नाव असून त्या नावामागची इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊया. कुणी दिलं मोचा हे नाव? जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (ESCAP) च्या सदस्यांनी एका यादी तयार केली आहे. या यादीमध्ये देशांची नाव आहे. प्रत्येक देश एका एका चक्रीवादळाला नाव देतो. यामध्ये भारताचाही समावेश आहे. मात्र सध्याच्या चक्रीवादळाचं नाव भारताने सुचवलेलं नाही.

News18लोकमत
News18लोकमत

अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर चक्रीवादळाचं नाव ठरवणारा एक संघ आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. या संघातील प्रत्येक देश चक्रीवादळाचं नाव सुचवत असतो. अर्थात एका देशाला एकच नाव एकावेळी सुचवता येतं, नंतर दुसरा देश चक्रीवादळाला नाव देतो. हे नाव येमेनने सुचवलेलं आहे.

मोचा चक्रीवादळाचा धोका, कसं ठरवलं जातं चक्रीवादळाचं नाव?

मोचा नावामागची गोष्ट? येमेनने या चक्रीवादळाचे नाव लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘मोचा’ या बंदराच्या नावावरुन सुचवलं आहे. त्यामुळे या देशानं चक्रीवादळाला मोचा हे नाव दिलं आहे. कुठपर्यंत दिसणार परिणाम? आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चक्रीवादळ येईल असा अंदाज वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीस दक्षिण बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कमी दाबाने चक्रीवादळाचे रूप धारण करण्याची दाट शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. या चक्रीवादळाचा प्रभाव पूर्व भारतापासून बांगलादेश आणि म्यानमारपर्यंत दिसू शकतो.

Cyclone Mocha: बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोचा चक्रीवादळ, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम पाहा PHOTO

हवामान विभाग काय म्हणाले? हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच चक्रीवादळाबाबतचा अलर्ट दिला आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चक्रीवादळामुळे येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण तयारी झाली असल्याचं आधीच सांगितलं आहे. याशिवाय समुद्रकिनाऱ्याजवळ कोणीही जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. या काळात ओडिसामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा, राज्यातील 15 जिल्ह्यांत पावसाची शक्यता

महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? या सोबतच पश्चिम बंगालच्या खाडीलगत असलेल्या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. येत्या चार दिवसांसाठी राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. 6 मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात