JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / E-Vehicle: तुम्हाला माहितीये स्वस्तात मस्त ई-व्हेईकल कशी बनते?

E-Vehicle: तुम्हाला माहितीये स्वस्तात मस्त ई-व्हेईकल कशी बनते?

E-Vehicle: 23 वर्षीय इंजिनिअर ई-व्हेईकल बनवतोय. ई-बाईक वापरण्यासाठी काय काळजी घ्यावी माहितीये का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वर्धा, 17 जुलै: तुम्ही बॅटरीवर चालणारी गाडी बघितली असेल. ही गाडी तुम्ही चालवलीही असेल. पेट्रोलच्या वाढत्या किमती बघता इलेक्ट्रिसिटी वर चार्ज होणारी गाडी आजच्या काळात अनेकांना आकर्षित करते आहे. पेट्रोलच्या वाहनांच्या गर्दीमुळे होणारं हवेतलं प्रदूषण टाळायचं असेल तर एक उपाय म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स होय. वाहन उद्योगातील भविष्य ई-कार किंवा ई-बाईक हे वाहन क्षेत्रातलं भवितव्य आहे असं म्हंटलं जातं. त्यामुळे वर्ध्यातील एका 23 वर्षीय इलेक्ट्रिकल इंजिनिअर विश्वम उमरे याने ई- बाईक तयार करून विक्री करणे सुरू केलेय. या गाडीबद्दल त्याने युजर्ससाठी महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. ही बॅटरीवर चालणारी गाडी नेमकी कशी बनते? ती तयार करण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा उपयोग होतो आणि ही गाडी बनण्यासाठी किती वेळ लागतो? याबाबत ई-एश्वा या ई-व्हेहिकल निर्माती कंपनीचे मालक उमरे यांनी माहिती दिली आहे.

बॅटरी पाण्यापासून दूरच ठेवा कोणतीही कम्पनी बॅटरी पाण्यापासून सुरक्षित राहावी यासाठी काळजी घेते. मात्र तुमच्याकडे जर ई-व्हेईकल असेल तर पावसाळ्यात तुम्हीही काळजी घ्यावी. कारण ही गाडी पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे पाण्यामुळे बॅटरी भिजनार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जर थेट पाण्याने गाडी धुवत असाल तर तेही टाळत तुम्हाला ओल्या कापडाने गाडी पुसणे फायदेशीर ठरेल, असे विश्वमने सांगितले. वारंवार चार्ज करणे बंद करा तुम्ही गाडी चालवून घरी आल्यानंतर तिला लगेच चार्ज करण्यासाठी ठेवत असाल किंवा वारंवार चार्ज करत असाल तर असे करू नका. बॅटरी खराब होऊ शकते. धोकादायक देखील ठरू शकते. त्यामुळे ई-व्हेईकल वापरणाऱ्यांसाठी ही माहिती जाणून घेणे गरजेचे आहे, असे विश्वम उमरे सांगतो. Chandrayaan-3: चांद्रयानच्या गगनभरारीचं सांगली कनेक्शन, सोले पिता-पुत्रांची मोठी कामगिरी ई-बाईक ठरतेय फायद्याची पेट्रोलचे वाढत जाणारे दर बघता बॅटरीवर चालणारी गाडी ही अनेकांना फायदेशीर ठरते. ही गाडी खूप वर्ष टिकावी आणि खर्चात बचत व्हावी, असं प्रत्येकालाच वाटतं. तर त्यासाठीच या गाडीची काळजी देखील घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमच्याकडे देखील इलेक्ट्रिक बाईक असेल तर इंजिनीयरने सांगितलेल्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करणं महत्त्वाचं असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या