जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chandrayaan-3: चांद्रयानच्या गगनभरारीचं सांगली कनेक्शन, सोले पिता-पुत्रांची मोठी कामगिरी

Chandrayaan-3: चांद्रयानच्या गगनभरारीचं सांगली कनेक्शन, सोले पिता-पुत्रांची मोठी कामगिरी

Chandrayaan-3: चांद्रयानच्या गगनभरारीचं सांगली कनेक्शन, सोले पिता-पुत्रांची मोठी कामगिरी

Chandrayaan-3: चांद्रयानच्या गगनभरारीचं सांगली कनेक्शन, सोले पिता-पुत्रांची मोठी कामगिरी

Chandrayaan-3: चांद्रयान 3 मोहिमेचं सांगलीशी खास कनेक्शन आहे. पाहा सोले पिता-पुत्रांची मोठी कामगिरी..

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

सांगली, 16 जुलै: नुकतेच श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान 3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले आणि भारताच्या अंतराळ संशोधन प्रकल्पाच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले गेले. ही मोहीम सांगलीच्या दृष्टीनेही गौरवाची ठरली आहे. या रॉकेट लाँचरचे काही भाग सांगलीत तयार झाले आहेत. डॅझेल डायनाकोट्स प्रा. लि. या कंपनीचे डायरेक्टर निहार सोले आणि त्यांचे वडील संदीप सोले यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. सोले पित्रा-पुत्रांची कंपनी सांगलीत डॅझेल डायनाकोट्स या कंपनीची सुरुवात 1997- 98 च्या दरम्यान झाली. संदीप सोले यांनी आपल्या अथक परिश्रमाने ही कंपनी नावारूपाला आणली. आज या कंपनीची धुरा त्यांचा मुलगा निहार सांभाळत आहे. सुरुवातीला इस्रो आणि भारताचा संरक्षण विभागाच्या काही मिसाईल्स यांच्या सुट्या भागांची निर्मिती त्यांनी केली. त्यावेळी त्यांच्या कडे त्यासाठी लागणारी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. ही यंत्रणा इतक्या उच्च प्रतीची असणे अत्यावश्यक असते, त्या सर्व बाबी त्यांनी आपल्या फॅक्ट्रीमध्ये नव्याने तयार करून घेतल्या आणि कामास सुरवात केली.

News18लोकमत
News18लोकमत

30 वर्षांची मेहनत डॅझेल डायनाकोट्स कंपनी आज ज्या स्थितीमध्ये आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी संदीप सोले याना 30 वर्षांची मेहनत करावी लागली. ही जी रॉकेट लॉंचर्स बनवली जातात त्यांचा वापर संरक्षण खात्यासाठी लागणारी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला जातो. पृथ्वी, अग्नी, आकाश, ब्रम्होस, त्रिशूल, प्रलय, पिनाका यासारख्या मिसाईल्स मध्ये बेसिक सिस्टीम एकच वापरली जाते. त्यामध्ये खाली थ्रस्ट (जोर) लावणारी यंत्रणा तयार केलेली असते. त्यातूनच त्याला पुढे सरकण्यासाठी गती मिळते. त्याचा फ्लाईट पैटर्न निश्चित होतो. कोटिंग करण्याचे काम या सगळ्या ठिकाणी हे कोटिंग लागते. हे कोटिंग आपल्याकडे तयार झाले आहे. असे मी अभिमानाने सांगू शकतो. आणि त्यासाठी गेली 30 वर्षे आम्ही रिसर्च आणि डेव्हलपमेंट केले गेले आहे. हे सगळे त्याचेच योगदान आहे. हे प्रॉडक्ट रेडिमेड कुठल्या कंपनीकडे उपलब्ध नसते. यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. आम्ही खूप मेहनत घेऊन हे प्रॉडक्ट्स तयार केले आहेत. ज्यावर इसरो विश्वास ठेवते. जेव्हा रॉकेट सारखी मोहीम होते तेव्हा ते एकट्या माणसाचे यश नसते. त्यामागे खूप मोठी टीम असते. जशी इस्रोची टीम आहे तसे त्यामध्ये आमच्या डॅझेलच्या टीमचेही सहकार्य आहे. त्यामुळेच हे एवढे मोठे यश प्राप्त झाले आहे, अशी प्रतिक्रिया निहार सोले यांनी व्यक्त केली आहे. तुम्हाला माहितीये का ISRO चा फुल फॉर्म? कशी मिळते इथे नोकरी, किती असतो पगार ? दीड वर्षांत काम पूर्ण या चांद्रयान- 3 मोहिमेचे पार्ट तयार करण्याची इन्कवायरी आमच्याकडे 2020 सालच्या में जूनच्या दरम्यान झाली होती. आणि ते पूर्ण व्हायला 2021 चा डिसेंबर उजाडला होता. साधारणपणे दीड वर्षं हे काम सुरू होते. या दीड वर्षाच्या काळात ह्या पार्ट्सच्या कोटींगचे काम आमच्याकडे सुरू होते. हे पार्टस खूप मोठे असतात. अजस्त्र असतात. त्यातील काही पार्टस तर 15 ते 20 टनाचे होते. हे इतके मोठे पार्टस श्रीहरिकोटा येथून आणणे, त्याचे येथे कोटिंग करणे आणि पुन्हा त्याची वाहतूक जरून ते श्रीहरिकोटा येथे पोहोचवणे हा खूपच मोठा चॅलेंजिंग जॉब होता. ही मोहीम खूपच मोठी असल्यामुळे वेळेचे खूप महत्त्व होते. प्रत्येक गोष्ट करणे, एकाचवेळी 2, 3 जॉबचे काम करणे, त्याचे रेकॉर्ड ठेवणे ही सर्व कामे अगदी काटेकोरपणे आम्ही जवळपास अर्ध्या वेळेत पूर्ण केली, असेही निहाल यांनी सांगितले. सांगलीकरांना अभिमान चांद्रयान 3 या महत्वकांक्षी मोहिमेमध्ये संगलीसारख्या छोट्याशा शहरात असणाऱ्या कंपनीने इतके मोठे योगदान दिले आहे. हे पाहून प्रत्येक सांगलीकर नागरिकाची छाती अभिमानाने फुलून येईल अशीच संदीप आणि निहार सोले या पितापुत्रांची नेत्रदीपक कामगिरी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: isro , Local18 , sangli
  • First Published :
जाहिरात
जाहिरात