वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 10 फेब्रुवारी: जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा काहींचा वेगळा दृष्टिकोन असतो. मात्र, राज्यातील काही जिल्हा परिषद शाळांनी शिक्षण क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. अशीच एक शाळा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे आहे. संपूर्ण डिजिटल असणाऱ्या या शाळेत विविध नवोपक्रम राबविले जातात. त्यामुळे या शाळेकडे आदर्श शाळा म्हणून पाहिले जाते.
26 शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षण प्रवाहात समुद्रपूरच्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक नरेश वाघ हे शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करतात. त्यांनी गेल्या तीन वर्षात 26 शाळा बाह्य विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणल आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांची समजूत काढून त्यांना शाळेचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे ते विद्यार्थी आता नियमित शाळेत आहेत. शाळेच्या या उपक्रमाची नोंद सर फाउंडेशननेही घेतली आहे.
HSC Exam 2023: कॉपी बहाद्दर सावधान! परीक्षा केंद्रावर आहे ‘तिसऱ्या डोळ्या’चा वॉच, Videoविज्ञान प्रयोगशाळा, योगा आणि नवोपक्रम
शाळेत तालुक्यातील सर्वात मोठी विज्ञान प्रयोग शाळा आहे.सोबतच विविध विज्ञान प्रदर्शनांत या शाळेतील विद्यार्थी सहभागही होतात. तसेच बक्षिस ही मिळवतात. ही शाळा संपूर्ण डिजिटल असून शाळेतील शिक्षक मुलांना संगणक साक्षर करतात. शाळेत विद्यार्थ्यांना योगा व विविध खेळ शिकवले जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकासासाठीही प्रयत्न केले जातात. तसेच विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे धडेही दिले जातात.
Inspiring Teacher: विद्यार्थ्यांसाठी सुरू केला ‘ऑनलाईन कट्टा’, सांगलीच्या शिक्षकाची राज्यभर चर्चा, Videoदप्तरमुक्त शनिवार
शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणारे दप्तरांचे ओझे ही एक वेगळी समस्या आहे. परंतु, समुद्रपूरच्या शाळेने विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. ‘दप्तरमुक्त शनिवार’ या उपक्रमानुसार शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तर घेऊन शाळेत येण्याची गरज नाही. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध वक्ते बोलावले जातात. तसेच कौशल्य विकासाचे विविध उपक्रम घेतले जातात. या उपक्रमांना विद्यार्थी आणि पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.