मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /HSC Exam 2023: कॉपी बहाद्दर सावधान! परीक्षा केंद्रावर आहे 'तिसऱ्या डोळ्या'चा वॉच, Video

HSC Exam 2023: कॉपी बहाद्दर सावधान! परीक्षा केंद्रावर आहे 'तिसऱ्या डोळ्या'चा वॉच, Video

X
राज्यात

राज्यात 21 फेब्रुवारीपासून 12 वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने कडक पाऊले उचलली आहेत.

राज्यात 21 फेब्रुवारीपासून 12 वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाने कडक पाऊले उचलली आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Bid (Beed), India

  रोहित देशपांडे, प्रतिनिधी

  बीड, 10 फेब्रुवारी: राज्यातील बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत‌. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण विभाग आता कामाला लागला आहे. विद्यार्थी देखील दिवस रात्र परीक्षेची तयारी करताना दिसून येत आहेत. मात्र यावर्षी परीक्षेमध्ये काही गैरप्रकार घडू नये म्हणून बोर्डाने आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

  जुन्या नियमाप्रमाणे परीक्षा

  कोरोना काळात बारावीच्या विद्यार्थ्यांना होम सेंटर आणि अर्ध्या तासाची वाढीव सवलत देण्यात आली होती. मात्र यावर्षी ही सवलत रद्द करण्यात आली असून जुन्या नियमाप्रमाणेच परीक्षा घेतली जाणार आहे. शिवाय मोबाईल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न केला तर पाच वर्षांसाठी त्या परीक्षार्थीला अपात्र केले जाणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथकाची नजर देखील या परीक्षा केंद्रावर असणार आहे.

  लयभारी! केमिकल इंजिनिअर तरुणाची मसाले दुधासाठी चर्चा! नेमकं काय आहे खास पाहा VIDEO

  वाहनांवर 'वॉच', परीक्षा केंद्रावर 'तिसरा डोळा'

  बारावीच्या परीक्षांमध्ये दरवर्षी पेपर फुटण्याचे किंवा कॉपी केल्याचे प्रकार पुढे येत असतात. यावरच आता बोर्डाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवेक्षक कार्यालयापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पेपर घेऊन जाणाऱ्या वाहनांना जीपीएस लावण्यात आले आहे. या माध्यमातून या वाहनांचे थेट लोकेशन शिक्षण विभाग आणि बोर्डाला दिसणार आहे. परीक्षेसाठीच्या पेपरचे बंद पाकीटमधील सील फोडेपर्यंत या सर्व प्रक्रियेचे थेट चित्रीकरण होणार आहे.

  'माझं लग्न लावून द्या' तरुणाने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र, कारण वाचून अधिकारी चक्रावले

  बीड जिल्ह्यात 38 हजार 929 विद्यार्थी देणार परीक्षा

  बीड जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे पूर्वी जशा परीक्षा पार पडत होत्या तशाच यावर्षी देखील परीक्षा पार पडणार आहेत. जिल्ह्यामध्ये, 38 हजार 929 विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी जिल्ह्यामध्ये 101 परीक्षा केंद्र असणार आहेत. त्यासाठी 15 परिवेक्षकांची निवड करण्यात आली आहे.

  Inspiring Teacher: विद्यार्थ्यांसाठी सुरू केला 'ऑनलाईन कट्टा', सांगलीच्या शिक्षकाची राज्यभर चर्चा, Video

  औरंगाबाद बोर्ड सज्ज

  12 वीच्या परीक्षा घेण्यासाठीची औरंगाबाद बोर्डाची तयारी पूर्ण झाली आहे. परिवेक्षक कार्यालयापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत वाहनाचेही सर्व चित्रीकरण केले जाणार आहे. जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी माहिती औरंगाबाद बोर्डाचे सहाय्यक सचिव वाय. एस दाभाडे यांनी दिली आहे.

  First published:
  top videos

   Tags: Education, HSC Exam, Local18