ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबई, 18 जून, उदय जाधव : आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर मुंबईमध्ये पार पडणार आहे. या शिबीराला सुरुवात झाली आहे. मात्र शिबीरापूर्वीच ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या विधान परिषद आमदार मनिषा कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता मनिषा कायंदे या वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचं राज्यव्यापी शिबीर वरळीमध्ये पार पडत आहे. या शिबीराला सुरुवात झाली आहे. मात्र शिबीरापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांचा फोन नॉट रिचेबल असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे कायंदे या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन त्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
खूशखबर! आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही; शिंदे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णयदरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचं वरळीमध्ये शिबीर पार पडत आहे, या शिबीरामध्ये बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘वाघ निघाले गोरेगावला असं मिंधे गटाचं बॅनर लागलं आहे, पण खरे वाघ इथे आहेत, त्यांनी तर वाघाचं कातड पांघरलं’ असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्यामध्ये निवडणूक घेण्याची हिंमत आहे का असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान आज आणि उद्या शिवसेनेची पुढची दिशा ठरेल, उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे अध्यक्ष राहातील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.