जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खूशखबर! आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही; शिंदे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

खूशखबर! आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही; शिंदे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

रेशनबाबत महत्त्वाचा निर्णय

रेशनबाबत महत्त्वाचा निर्णय

रेशनबाबत मंत्रालयाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 जून, तुषार रुपनवार :  रेशन वाटपाबाबत मंत्रालयीन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार आता लाभधारकांना रेशनसाठी स्वस्तधान्य दुकानात जाण्याची गरज नाहीये. फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना धान्याचं वितरण होणार आहे.‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. मोबाईल व्हॅनमार्फत शिधा वाटप ‘शासन आपल्या दारी’  अभियानाच्या धर्तीवर राज्यात ‘रेशन आपल्या दारी हा उपक्रम लवकरच सुरू होणार आहे. याबाबत मंत्रालयीन बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निर्णय घेतला आहे.  या निर्णयानुसार आता रेशन दुकानात जाण्याची गरज लागणार नाही, तर  फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. मुंबई-ठाण्यात मोबाईल व्हॅनमार्फत शिधा वाटप करण्यात येणार आहे. या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

Monsoon Update: मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट; आज महाराष्ट्राच्या ‘या’ भागात जोरदार पावसाचा इशारा

‘लाभार्थ्यांना वंचित ठेऊ नका ‘ दरम्यान जे पात्र लाभार्थी आहेत, त्यापैकी कोणालाही अन्न धान्यापासून वंचित ठेवू नका असे आदेश चव्हाण यांनी शिधावाटप अधिकाऱ्या्ंना दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात