राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना धमकी
वैभव सोनवणे प्रतिनिधी पुणे : छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर भुजबळ यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ यांना धमकी देणाऱ्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे.
आरोपीने पोलिसांच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार फक्त छगन भुजबळच नाही तर आणखी काही बड्या नेते रडारवर होते. अजित पवार ,धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याचा धमक्या दिल्या होत्या.
Sharad Pawar : ‘माझ्या पुतण्याने सांगितल्यानंतर मी…’ छगन भुजबळ यांचा शरद पवार यांना खोचक टोलामंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली होती. दरम्यान धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं नाव प्रशांत पाटील असून, तो कोल्हापूरच्या चंदगड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पवार कुटुंबात भेटीगाठी वाढल्या, भावाच्या घरी अजितदादा तर पुतण्या शरद पवारांच्या भेटीलामद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचंही प्राथमिक तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.