JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच रत्नागिरीत शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच रत्नागिरीत शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात वेगळं चित्र पहायला मिळत आहे.

जाहिरात

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रत्नागिरी, 19 मार्च, शिवाजी गोरे : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटातील आणखी काही आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा देखील शिंदे गटातील नेते करताना दिसतात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात वेगळं चित्र पहायला मिळत आहे. दापोलीमध्ये ठाकरे गटाने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे.  शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक आणि दापोली नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. योगेश कदमांचे कट्टर समर्थक  दापोली नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर हे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र कुसाळकर यांनी आता ठाकरे गटात प्रवेश केल्यानं हा शिंदे गटासोबतच योगेश कदम यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. कुसाळकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी देखील ठाकरे गटाने जिल्ह्यात शिंदे गटाला धक्के दिले आहेत.

पंकजा मुंडेंची मागणी आणि मुख्यमंत्री शिंदेंनी व्यासपीठावरच केली मोठी घोषणा, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

संबंधित बातम्या

सभेपूर्वीच पक्षप्रवेश  रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जंगी सभा झाली होती. या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने खेड येथील गोळीबार मैदानात सभेचं आयोजन केलं आहे. या सभेचा ट्रिझर देखील जारी करण्यात आला आहे. मात्र सभेपूर्वीच एकनाथ शिंदे यांना जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना जिल्ह्यात आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनिती आखण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर संजय कदम यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या