नाशिक, 18 मार्च : ‘गोपीनाथ मुंडे यांनी समाजासाठी मोठ काम केलं आहे. त्यांच्यावर सगळ्या समाजातील लोकांचं प्रेम होतं. पंकजाताईंनी समस्या मांडली. मी शब्द देतो, मुंडे साहेबांच्या नावाने असलेली वसतीगृह उभारली जातील, त्यांच्या नावाने हॉस्पिटलही उभारले जातील आणि स्मारक सुद्धा होईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. नाशिकमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री दादाजी भुसे, राधाकृष्ण विखे-पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. (मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री अन् घडला धक्कादायक प्रकार, पोलिसांनी केला लाठीचार्ज VIDEO) ‘राज्याच्या राजकारणातला पट बदलण्याचं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे होते. मुंडे साहेबांनी अवघ महाराष्ट्र पिंजून काढला. पाऊस सुरू झाला आहे. पण पावसापेक्षा तुमचा आवाज जास्त आहे. शेतकऱ्यांनी चिंता करू नका सगळं भरून देऊ. शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे. आमचे मित्र गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे नेणाऱ्या या पंकजा मुंडे आहे. आपण कुठलही शुभ कार्य सुरू होत असताना आपण पत्रिका मंदिरात ठेवतो पण मुंडे साहेबांना मानणारे लोक भगवान गडावर पत्रिका ठेवता. 70 च्या दशकात भाजप पक्ष सायकल वर फिरून वाढवण्याच काम केलं. प्रसंगी पायी फिरून पक्षासाठी काम केलं, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. (अवकाळीने शेतकऱ्यांना मिळतेय ‘सजा’, बांधावर न जाता कृषिमंत्र्यांची चालली मजा) ‘तेव्हा देशाला भाजप आणि शिवसेना युतीची खरी गरज होती, मुंडे साहेब शिवसेना भाजप महायुतीचे शिल्पकार होते. बाळासाहेबांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठं प्रेम होतं. त्याचे साक्षीदार आम्ही आहोत, असंही शिंदे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







