स्वप्नील एरोंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 13 फेब्रुवारी : महाराष्ट्रानं भारतीय क्रिकेटला अनेक सुपपस्टार दिले आहेत. क्रिकेटच्या प्रत्येक पिढीत महाराष्ट्राचा एक तरी सुपरस्टार असतोच. टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा देखील महाराष्ट्रीयनच आहे. महाराष्ट्र आणि भारतीय क्रिकेटवर नेहमीच मुंबईचा वरचष्मा राहिला आहे. मुंबईच्या खेळाडूंच्या मक्तेदारीत सांगली सारख्या छोट्या शहरातील एक क्रिकेटपटू सध्या टीम इंडियाची आधारस्तंभ बनली आहे. सांगलीत क्रिकेटची धडे गिरवणारी आणि आता आंतरराष्ट्रीय सुपरस्टार झालेल्या स्मृती मानधनाचा आजवरचा प्रवास सर्वांनाच प्रेरणादायी आहे. भावापासून मिळाली प्रेरणा स्मृतीचे शाळेतील कोच प्रकाश फाळके यांनी तिच्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. ते गेल्या 12 वर्षांपासून सांगलीतील शाळेत क्रिकेटपटू घडवण्याचं काम करत आहेत. स्मृतीचा भाऊ श्रवण मानधाना हा त्यावेळी महाराष्ट्राच्या अंडर 15 टीममध्ये खेळत होता. भावाचा खेळ पाहून स्मृतीला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. तिच्यामधील स्पार्क हा अगदी लहान वयातही जाणवत होता. सांगली हा क्रिकेटसाठी ग्रामीण भाग होता. त्यामुळे मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी घरच्यांचे प्रोत्साहन आवश्यक होते. स्मृती त्याबाबतीत सुदैवी ठरली. तिचे वडील श्रीनिवास मानधनाच तिचा सराव घेत असत. स्मृती पहिल्यांदा उजव्या हाताने बॅटींग करत असे. पण, श्रवण डावखुरा असल्यानं तिनंही डाव्या हातानं बॅटींग करण्यास सुरूवात केली. आज ती जगातील उत्तम डावखुरी बॅटर बनली आहे. भावाचा खेळ पाहूनच स्मृतीची प्रगती होत होती. ती महाराष्ट्राकडून पहिल्यांदा शालेय क्रिकेट खेळली त्यावेळी मी तिचा कोच होतो याचा मला आज अभिमान वाटतो, असं फाळके यांनी सांगितलं. 8 ओव्हर्समध्ये लावला होता मॅचचा निकाल ‘मुंबई एक्स्प्रेस’ सायलीचं काय आहे स्वप्न?Video ‘माझा विश्वास खरा ठरला’ ‘स्मृती मानधनाचा खेळ पहिल्यापासूनच जबरदस्त होता. ती भारतीय टीमकडून खेळेल, असा विश्वास मी तिच्या वडिलांशी बोलताना व्यक्त केला होता. माझा तो विश्वास खरा ठरला,’ असंही फाळके यावेळी म्हणाले. यावर्षी पहिल्यांदाच महिला आयपीएल स्पर्धा होणार आहे. पाच टीममध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील स्मृती एक प्रमुख खेळाडू असेल, एक सांगलीकर म्हणून मला तिचा अभिमान वाटतो,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. WPL Auction 2023 : पाकिस्तानला पराभूत करणारी मुंबईकर होणार मालामाल, सर्वच टीममध्ये रंगणार चढाओढ सांगलीतील मुलींसाठी आयडॉल सांगलीकर स्मृती मानधाना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार झालीय. संपूर्ण देशात तिचे अनेक फॅन्स आहेत. सांगलीतील शालेय क्रिकेटपटूंची तर ती आता आयडॉल बनलीय. सांगलीतील मुलीही आता नियमित क्रिकेट खेळत आहेत. स्मृतीप्रमाणेच फाळके सरांची विद्यार्थीनी असलेली गायत्री कोळी ही सांगलीच्या शालेय क्रिकेटमधील एक उगवती स्टार आहे. तिचा मुंबईमध्ये स्मृतीच्या हस्ते सत्कारही झाला. महेंद्रसिंह धोनीनं तिला एक बॅट भेट दिली होती. ‘मला मोठं होऊन स्मृती मानधनासारखं देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे, अशी आपली इच्छा गायत्रीनं बोलून दाखवली.