मुंबई, 13 फेब्रुवारी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) आयपीएलच्या धर्तीवर महिलांचीदेखील टी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी मार्च महिन्यात या वुमेन्स इंडियन प्रीमिअर लीगचा (डब्लूआयपीएल) पहिला सीझन खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण पाच टीम सहभागी होणार आहेत. त्यासाठी आज (13 फेब्रुवारी) खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये एका भारतीय स्टार खेळाडूला मोठी किंमत मिळू शकते. ही खेळाडू सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, तिला आपल्या टीममध्ये सहभागी करून घेण्यासाठी सर्व पाच फ्रँचायझी मोठी किंमत मोजण्याचा प्रयत्न करतील. जेमिमाह रॉड्रिग्ज, असं या खेळाडूचं नाव आहे. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं. पाकिस्तानच्या पराभवात मोठा वाटा जेमिमाह रॉड्रिग्जची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण, सध्या सुरू असलेल्या महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या पहिल्याच मॅचमध्ये तिनं धडाकेबाज खेळी केली आहे. जेमिमाहनं टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये स्वत:च्या हिमतीवर विजय मिळवून दिला. तिच्यामुळेच भारतीय टीमला मॅच जिंकण्यात यश आलं. मुंबईकर जेमिमाहचं अर्धशतक, भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय पाकिस्तानविरुद्ध जेमिमाहनं 38 बॉलमध्ये 53 रन्सची खेळी केली. त्यामध्ये आठ फोरचा समावेश होता. भारताला शेवटच्या 24 बॉल्समध्ये 41 रन्सची गरज होती. त्यावेळी जेमिमानं उत्कृष्ट खेळ करत मॅच भारताकडे वळवली. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या मॅचमधील सर्वोत्तम खेळीसाठी तिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. जेमिमाचा जबरस्त रेकॉर्ड 22 वर्षांची जेमिमाह सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. जगातील कोणत्याही बॉलर्सचा सामना करण्याची क्षमता तिच्याकडे आहे. ती उजव्या हाताने बॅटिंग आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक बॉलिंग करते. टी-20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मिताली राजनंतर सर्वांत वेगवान एक हजार धावा पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे. पहिल्या WPLमध्ये होणार 409 खेळाडुंचा लिलाव, Jio Cinemaवर प्रक्षेपण भारतासाठी आतापर्यंत 21 वन-डे मॅचेसमध्ये 394 रन्स आणि 76 टी-20 मॅचेसमध्ये 1 एक हजार 628 रन्स केले आहेत. कोणत्याही क्षणी मॅच फिरवू शकते. त्यामुळेच आज होणाऱ्या डब्लूआयपीएल ऑक्शनमध्ये तिला सर्वाधिक किंमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 90 खेळाडूंवर लागणार बोली डब्लूआयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये एकूण पाच टीम खेळणार आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी), गुजरात जायंट्स आणि यूपी वारियर्सचा समावेश आहे. 409 खेळाडूंच्या यादीतील 90 खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.