JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Success Story: सांगलीच्या हमालाचा मुलगा बनला 'इंजिनिअर पिझ्झावाला', पाहा Video

Success Story: सांगलीच्या हमालाचा मुलगा बनला 'इंजिनिअर पिझ्झावाला', पाहा Video

इंजिनिअर झालेल्या प्रत्येक तरुणाचं मोठ्या पॅकेजची नोकरी मिळवणं हे स्वप्न असतं. पण सांगलीतील मल्लिकार्जुन नांदुरे हा नोकरी सोडून इंजिनिअर पिझ्झावाला झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 14 फेब्रुवारी: पुण्यातील एखाद्या मोठ्या कंपनीत चांगल्या पॅकेजची नोकरी मिळावी, असे प्रत्येक इंजिनिअरचे स्वप्न असते. पण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले असे भाग्यवान मोजकेच असतात. चांगल्या नोकरीचे स्वप्न पूर्ण न झाल्याने काहीजण खचून जातात. परंतु, अशांसाठी सांगलीतील इंजिनिअर तरुणाचा ‘हमालाचा मुलगा ते इंजिनिअर पिझ्झावाला’ हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

हमालाचा मुलगा इंजिनिअर मल्लिकार्जुन नांदुरे यांचे वडील सांगलीतील वसंतदादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करतात. घरची परस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी मुलगा मल्लिकार्जुन याला इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले. मुलानेही जिद्दीने इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला आणि नोकरीसाठी पुणे गाठले. पुण्यातील एका कंपनीत नोकरी मिळाली परंतु, पगारात दैनंदिन गरजा कशाबशा पूर्ण होत होत्या. कमी पगारामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. Success Story : इंजिनिअर तरुण पोहे व्यवसायातून कसे बनले करोडपती? पाहा Photos इंजिनिअर पिझ्झावाला झाला मल्लिकार्जुन याने नोकरी सोडून सांगलीत परतण्याचा निर्णय घेतला. चांगला पगार मिळत नसल्याने नोकरी ऐवजी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पण याच काळात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊन काळात घरातच पिझ्झा बनवण्याचा प्रयत्न केला. घरच्या तव्यावर बनवलेल्या पिझ्झ्याची चव मित्रांनाही आवडली. त्यामुळे पिझ्झाचा गाडा सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्वत: इंजिनिअर असलेल्या मल्लिकार्जुन याने ‘इंजिनिअर पिझ्झावाला’ असेच नाव आपल्या व्यवसायाला दिले. Inspiring Teacher: विद्यार्थ्यांसाठी सुरू केला ‘ऑनलाईन कट्टा’, सांगलीच्या शिक्षकाची राज्यभर चर्चा, Video भावाचीही साथ मल्लिकार्जुनला ‘इंजिनिअर पिझ्झावाला’ सुरू करण्यात भाऊ माळू याचीही साथ मिळाली. दोघेही युट्युब आणि मोठ्या हॉटेलात बघून पिझ्झा बनवायला शिकले. मात्र, आता त्यांनी स्वत:ची ‘टेस्ट डेव्हलप’ केली आहे. त्याला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला आणि आयुष्यात चहानं आणला गोडवा! पाहा Video साठ रुपयात पिझ्झा नोकरीच्या मागे न लागता दोघा भावांनी मिळून सहा महिन्यांपूर्वी पिझ्झा-बर्गर-फ्रेंच फ्राइजचा गाडा सुरू केला. दुपारी चार ते रात्री साडेदहा पर्यंत गाडा सुरू असतो. १४ प्रकारचा पिझ्झा इथं मिळतो. पण कॉर्न चीज पिझ्झा आणि कॅप्सिकम चीज पिझ्झा या दोन डिशेस लोकप्रिय आहेत. बेकरीतून आलेला ताजा पिझ्झा बेस आणि बाजारातून आणलेल्या ताज्या भाज्यांचा वापर पिझ्झा बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे साठ रुपयात मिळणारा पिझ्झा आता इंजिनिअरिंग कॉलेजच्या पोरांची गर्दी खेचतोय. नोकरीतून चांगले पैसे मिळत नव्हते पण आता चांगला व्यवसाय होतोय. इंजिनिअर पिझ्झावाला हे नाव आणि आम्ही बनवलेल्या पिझ्झाची चव लोकांना आवडत आहे, असे मल्लिकार्जुन सांगतात. गुगल मॅपवरून साभार.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या