इंजिनिअरिंग सोडून सुरू केली Dairy, आता पगारापेक्षा अधिकची कमाई

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. 

अनेक तरुण नैराश्यात गेल्याचे आपण पाहिले असेल.

नोकरी गेली तरी हार न मानता वर्धा  येथील दोन भावंडांनी दुग्ध व्यवसाय उभारला आहे.

व्यवसायाच्या सुरुवातीला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. दोन गाईंपासून सुरू केलेला व्यवसाय आता 19 गाईंपर्यंत पोहचला आहे.

तरुणांनी दूध विक्रीतून स्वावलंबी अर्थकारण उभे केले आहे.

प्रणय आणि देवानंद गिरडे असे या भावंडाची नाव आहेत. 

दररोज 80 ते 90 लीटर दूध निघते. यामधून साधारण नोकरीच्या तुलनेत ते जास्त पैसे कमवायला लागले आहेत.