JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मी एकनाथ शिंदेंचा फॅन'; ठाकरेंच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, पुन्हा खिंडार पडणार?

'मी एकनाथ शिंदेंचा फॅन'; ठाकरेंच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, पुन्हा खिंडार पडणार?

सांगली जिल्ह्याच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ यांचे जाहीर कार्यक्रमात कौतुक केलं.

जाहिरात

एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली 17 एप्रिल : सांगली जिल्ह्याच्या उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ यांचे जाहीर कार्यक्रमात कौतुक केलं. आपण “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फॅन” असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच कामाच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांचा हात कोणी धरू शकत नाही, असेदेखील ते म्हणाले. यानंतर आता सांगली जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला आता पुन्हा खिंडार पडणार , अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आनंद पवार यांच्या पाठोपाठ आता थेट सांगली जिल्ह्याचे ठाकरे गट शिवसेनेचे सध्याचे जिल्हाप्रमुख संजय विभुते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण सांगलीमध्ये लिंगायत समाजाच्या पार पडलेल्या मेळाव्यामध्ये बोलताना संजय विभुते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फॅन आणि कार्यकर्तेदेखील असल्याचं जाहीर केलं आहे. पटोलेंच्या भाषणावेळी ‘महाविकासआघाडी’ची ‘नाना’, नेते मोबाईलमध्ये बिझी, Video तसंच कामाच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांचा हात कोणी धरू शकत नाही, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. आता एकनिष्ठ राहण्याचे दिवस राहिले नसून जो तगडा माणूस आहे त्याच्या पदरात पडतं अशी परिस्थिती झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. जाहीर कार्यक्रमात केलेल्या या कौतुकामुळे आता संजय विभुते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता पुढे संजय विभुते काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या