पंकजाताई-धनुभाऊचं मनोमिलन

गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता संघर्षात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद सर्वश्रूत आहे. पण आता नवे संकेत मिळत आहे.

संत भगवान बाबा यांच्या नारळी सप्ताहात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन झालेले पाहायला मिळाले. यामुळे बहीण भावातील संघर्षाची दरी कमी झाल्याची व्यासपीठावरुन दोघांनी घोषणा केली. 

भगवान गडाच्या पायथ्याशी भारजवाडी गावात नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पूर्णविराम झाल्याची कबुली दोघा बहिण भावाने दिली.

'माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे' - पंकजा मुंडे 

'दोघेही आम्ही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा शक्ती सारखी आहे'- पंकजा मुंडे 

'आमच्या दोघा बहिण भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर या नारळी सप्ताहात कमी झालं' - धनंजय मुंडे 

'आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचाराने काम करतो. विचारांमध्ये भलेही दूर असली तरी चालेल पण घरामधल्या संवादामध्ये एक तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे. ते अंतर कमी झालं' '- धनंजय मुंडे 

मोठा भाऊ या नात्याने लहान बहिणीने जे करायला सांगितला आहे ते मी सर्व करेल. आमचं एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही'- धनंजय मुंडे

 भक्तांच्या समोर आज पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे मनोमिलन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे बहिण भाऊ एकत्रित येण्याचे संकेत नव्या राजकारणाची नांदी दाखवून देत आहेत

राष्ट्रवादीच्या हातातून घड्याळ का गेलं?