JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sangli News: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहेत ऐतिहासिक 55 विहिरी, कुठे? पाहा हा VIDEO

Sangli News: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आहेत ऐतिहासिक 55 विहिरी, कुठे? पाहा हा VIDEO

महाराष्ट्रातील ऐतिहासिक 55 विहिरी आता राज्याच्या नकाशात दिसणार आहेत. बारव दस्तावेज तयार करण्याचे काम सुरू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 4 जून: महाराष्ट्र बारव मोहीम व आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ऐतिहासिक बारवांचे डॉक्युमेंटेशन तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 55 पेक्षा जास्त ऐतिहासिक विहीर, बारव, पुष्करणी, तलाव, कुंड याचे मॅपिंग केले असून राज्यभरात 1900 पेक्षा जास्त विहिरीचे मॅपिंग केले आहे. त्यांना एक नवीन ओळख देण्यासाठी आणि या ऐतिहासिक वारसांची समाजाला व तरुण पिढीला माहिती होण्यासाठी डॉक्युमेंटेशनचे काम चालू आहे. यात प्रामुख्याने तासगाव ढवळवेस येथील सन 1828 मध्ये बांधलेल्या बारवचा समावेश आहे. त्यानंतर नेवरी येथील ऐतिहासिक पुष्करणीचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती बारव अभ्यासक महेश मदने यांनी दिली. ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर तासगावचा हा ऐतिहासिक वारसा अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना शिवनेरी ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी माझी वसुंधरा या मोहिमेंतर्गत निधी मंजूर केला. याद्वारे बारवची स्वच्छता करून हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली व एक प्रकारे त्यास नवीन जीवनदानच दिले आहे.

ऐतिहासिक बारव डॉक्युमेंटेशन मोहीम ऐतिहासिक बारव डॉक्युमेंटेशन मोहिमेमध्ये महाराष्ट्र बारव मोहिमेचे प्रतिनिधी महेश मदने व शिवानंद धुमाळ तसेच आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सांगली यांचे प्रतिनिधी अतुल कोगनोळे व किशोरी मोहिते यांनी सहभाग घेतला. तसेच स्थानिक महादेव दाजी जाधव व इकबाल नदाफ यांचे सहकार्य मिळाले. यामुळे हा ऐतिहासिक ठेवा समाजासमोर येऊन त्याचे महत्त्व लोकांना समजणार आहे. तसेच आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हा एक नवीन विषय अभ्यासासाठी मिळणार आहे. बायकोला कुंकू लावलं आणि पाया पडले, भर कार्यक्रमात पुरुषांनी असं का केलं? VIDEO ऐतिहासिक स्थळांबाबत जागृतीची गरज आंधळी व कर्नाळ येथील बारवांचे कामही सन 1828 मध्ये झाल्याचे शिलालेख आहेत व ते पटवर्धन सरकारांनी केल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते. म्हणजेच ही बारव सुद्धा पटवर्धन सरकार यांनीच बांधली असावी, असा एक अंदाज बांधता येतो. पण मालकी हक्कावरून वाद झाल्याने बारवमध्ये असणारे दोन्ही शिलालेख तोडफोड केल्याचे दिसून येते. इतिहासाबद्दल समाजात जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. तरुण पिढीने वारसा घ्यावा तरच ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धन जनजागृती मोहिमेला नव्याने ओळख मिळेल, असे मदने यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या