‘इथं’ मिळाले 2500 वर्षांपूर्वीच्या खेळाचे अवशेष
आधुनिक युगात मोबाईल आणि कॉम्पुटरवर घरबसल्या अनेक खेळ खेळता येतात.
त्याचबरोबर मैदानी खेळांमध्येही बरीच प्रगती झालीय.
पण, पूर्वीच्या काळी ही साधनं मर्यादीत होती. त्या काळी असलेल्या खेळाच्या मनोरंजनाच्या साधनांबाबत आजही मोठं कुतुहल आहे.
पुणे जिल्ह्यातल्या पिरंगुट गावाजवळील डोंगर रांगात 2500 वर्ष जुन्या खेळाचे अवशेष सापडले आहेत.
त्यामुळे याबाबतच्या संशोधनाला गती मिळणार आहे.
पिरंगुट गावच्या दक्षिण डोंगर रांगेत उभेवाडी डोंगरात मंकला या अडीच हजार वर्ष जुन्या खेळाचे अवशेष सापडलेत.
ॲड. मारुती गोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे अवशेष शोधले आहे.
पटराव गोळे आणि त्यांचे धाकटे बंधू मंगेश गोळे नेहमीप्रमाणे या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले असता त्यांना सर्वप्रथम इथे हे अवशेष दिसले.
जोरदार पाऊस पडून परिसर स्वच्छ झाल्यामुळे या प्राचीन अवशेषांचे दर्शन घडले.
हे अवशेष दृष्टीस पडल्यावर त्यांनी हे फोटो मारूती गोळे यांना पाठवले.
मारुती यांनी मंकाला खेळाच्या अभ्यासक सोज्वळ माळी यांच्याकडून हा मंकाला खेळ असल्याची खात्री करून घेतली.
'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास
Click Here