JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सांगलीच्या या पोरांची वृत्ती नाही चांगली, डिलीव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून केलं कांड

सांगलीच्या या पोरांची वृत्ती नाही चांगली, डिलीव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून केलं कांड

काही महाभागांनी ऑनलाईन मोबाईल मागवून डिलीव्हरी बॉयला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सांगली, 13 एप्रिल : सध्या ऑनलाईनसाईटवरून कोणतीही वस्तू मागवण्याचा जमाना सुरू आहे. यामुळे जोतो आपल्याला हवी असलेली वस्तू ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मागवतो. परंतु ऑनलाईन साईटवरून कधी कधी तुम्ही मागितलेल्या वस्तु ऐवजी भलतचं काही आलं तर तुम्ही संतापाने ते पार्सल परत पाठवता. दरम्यान याचा फायदा घेत काही महाभागांनी ऑनलाईन मोबाईल मागवून डिलीव्हरी बॉयला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील आहे. याबाबत पोलिसांनी योग्य ती कारवाई करत या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन साईटवरून महागडे मोबाईल फोन्स ऑर्डर करण्यात आले होते. ते पार्सल डिलिव्हरीसाठी आलेल्या डिलीव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून मोबाईल काढून बॉक्समध्ये साबणाच्या वड्या रिटर्न करून फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पठ्याने घरालाच बनवलं OYO हॉटेल, बोर्ड पाहून लागल्या रांगा, अखेरीस पोलीस सुद्धा आले मग….

संबंधित बातम्या

महंमद उर्फ जॉर्डन युसूफ इराणी (वय 29) व उम्मत युसूफ इराणी (29, दोघेही रा. ख्वॉजा कॉलनी, सह्याद्रीनगर,सांगली) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 14 मोबाईलसह दुचाकी असा 8 लाख 2 हजार 217 रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ऑनलाईन कंपनीला मोबाईलची ऑर्डर देवून ती देण्यासाठी येणाऱ्या डिलीव्हरी बॉयला बोलण्यात गुंतवून मोबाईल काढून घेत त्याऐवजी साबणाच्या वड्या देत फसवणूकीचे करण्याचे प्रकार वाढले आहेत.

इस्लामपूर आणि सांगली मध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी खास पथकाव्दारे या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश दिले होते.  

जाहिरात
पत्नी आपल्याला मारणार हे पतीला आधीच कळलं; त्याने व्हिडिओ बनवला, पण उशीर झाला अन्…

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, शहरातील भारत सुतगिरणी चौक येथे संशयित दोघे येणार आहेत. त्यानुसार छापा मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी गुन्ह्याची कबुली दिली.अशाप्रकारे १४ मोबाईल त्यांनी हातचलाखी करून काढून घेतल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या