उत्तर प्रदेशमधील मेरठ सारख्या उच्चभ्रू परिसरात एका व्यक्तीने चक्क घरालाच ऑयो हॉटेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेल तर सुरू केलं पण यामुळे शेजारी राहणाऱ्यांना त्रास सुरू झाला. रोज येणाऱ्या ग्राहकांमुळे शेजारीच पुरते वैतागले. अखेर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या घरमालकाचा भांडाफोड झाला. हॉटेलमधून 7 मुली आणि मुलांना अटक केली. एवढंच नाहीतर मॅनेजरकडे शाळा आणि कॉलेजमधील मुलींचे फोटो सुद्धा सापडले. गमंत म्हणजे, पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटरवर होते.
मेरठमधील टीपीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेदव्यासपुरी इथं एक ओयो हॉटेल युवी इनवर पोलिसांनी छापा मारला. यासाठी सामाजिक संस्थेचीही मदत घेण्यात आली होती.
ज्यावेळी हॉटेलमध्ये छापा टाकला होता तेव्हा या घरात 4 तरुणी आणि दलाल आढळून आले होते. हॉटेलचा मालक आणि चार तरुणींना अटक करण्यात आली.
या भागात असे अनेक हॉटेल अलीकडे उघडले आहे. मुळात हा रहिवासी भाग आहे. पण कॉलनीमध्ये काही घरमालकांनी आपल्या घराला ओयो हॉटेलचे बोर्ड लावले. त्यामुळे या परिसरात आंबडशौकीनांचा अड्डा बनला होता
या ओयो हॉटेल धंद्याच्या आड मानवी तस्करी केली जात असल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामाध्ये मोठे रॅकेट असल्याचं ही समोर आलं आहे. या कारवाईमध्ये हॉटेलमालकासह दलालाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, पोलिसांनी जेव्हा हॉटेल मॅनेजरकडे मोबाईल जप्त केले तेव्हा त्यांना धक्का बसला. मोबाईलमध्ये शाळकरी मुलींपासून ते कॉलेजमधील तरुणीचे फोटो आढळून आले. या मुलींना संपर्क करून बोलावले जात होते. त्यांना यामोबद्दल्यात रक्कम दिली जात होती. पोलिसांनी या कारवाईतून 2 मुलींची सुटका सुद्धा केली आहे.