मनिष कुमार (रेवा), 13 एप्रिल : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नानंतर विवाहितेचे एका पुरुषाशी प्रेमसंबंध होते, मात्र पतीमुळे प्रियकराला भेटण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे पत्नीने पतीला हटविण्याचा कट रचत त्याची हत्या केली आहे. हत्या करण्यासाठी तिने एक अनोखी पद्धत वापरल्याने जोरदार चर्चा होत आहे.
केलेल्या आरोपानुसार पत्नीने पतीच्या चहामध्ये विष मिसळून मारले आहे. चहात विष टाकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. चहा पिताना पतीच्या लक्षात आले यामध्ये काहीतरी आहे. आपण आता जगू शकत नाही या भितीने पतीने आपला मोबाईल घेत एक व्हिडीओ केला आहे. दरम्यान मुलाचा मोबाईल वडिलांच्या हातात गेल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
पठ्याने घरालाच बनवलं OYO हॉटेल, बोर्ड पाहून लागल्या रांगा, अखेरीस पोलीस सुद्धा आले मग….मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय शाहिद खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लोकांचा असा विश्वास होता की त्याने स्वतःच आपला जीव दिला होता, परंतु प्रकरण काही वेगळेच होते.
शाहिदचे 18 मार्च 2023 रोजी निधन झाले. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच शाहिदच्या वडिलांनी हॉस्पिटल गाठले. सासऱ्यांना आधीच आपल्या सुनेवर संशय होता. त्यांनी मुलाचा मोबाईल शोधण्यास सुरुवात केली असता त्यांना धक्कादायक पुरावा मिळाला. त्यामुळे त्यांच्या खुनी सुनेचे सत्य सर्वांसमोर आले.
वास्तविक, वडिलांना आपल्या मुलाचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये सापडला. यामध्ये शाहिदने आरोप केला आहे की, पत्नी गेल्या 6 महिन्यांपासून माझ्या हत्येचा कट रचत होती. माझ्या मृत्यूला माझी पत्नी सलीहा, तिचा प्रियकर बंटू खान आणि त्याचे आई-वडील जबाबदार आहेत.
हे वक्तव्य मी कोणाच्याही दबावाखाली येऊन करत नाही असेही तो या व्हिडीओत म्हणाला आहे. माझी हत्या करण्यासाठी 6 महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते आणि आज ते पूर्ण झाला.
सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात सलीहा परवीन, तिचा प्रियकर बंटू खान आणि इतरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. शाहिदने आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध सलीहासोबत प्रेमविवाह केला होता. पुढे सलीहा बंटू खानच्या प्रेमात पडली. शाहिदने चहा प्यायल्याबरोबर समजले आणि जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्याने पत्नी सलीहाचा व्हिडिओ बनवून खुलासा केला.