JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीनिमित्त करा महाराजांची पूजा, पाहा कुठं मिळतायत आकर्षक मूर्ती, Video

Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीनिमित्त करा महाराजांची पूजा, पाहा कुठं मिळतायत आकर्षक मूर्ती, Video

शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उस्मानाबादमध्येही शिवजयंतीची तयारी सुरू झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

परमेश्वर सोनावणे, प्रतिनिधी उस्मानाबाद, 10 फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. शिवप्रेमींनी सर्वत्र जन्मोत्सवाची तयारी सुरु केली आहे. दरवर्षी प्रत्येकजण आपआपल्या परीने शिवजयंती उत्सव साजरा करत असतो. शिवजयंती उत्सवासाठी शिवाजी महाराजांच्या मूर्ती, भगवे झेंडे यांना मोठी मागणी असते. उस्मानाबादमध्ये यंदा राजस्थानी कलाकारांनी घडवलेल्या शिवमूर्ती विक्रीसाठी आल्या असून त्यांना शिवप्रेमींकडून मोठी मागणी आहे.

राजस्थानी कलाकार बनवतात शिवमूर्ती उस्मानाबादमध्ये शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होते. त्यासाठी बाजारपेठही सजलेली असते. यंदाही राजस्थानमधील कलाकारांनी बनवलेल्या शिवमूर्ती उस्मानाबादमध्ये विक्रीसाठी आलेल्या आहेत. हे कलाकार सध्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात वास्तव्यास आहेत. ते तिथे मूर्ती घडवून विक्रीसाठी उस्मानाबादमध्ये आणतात. दरवर्षी हे कलाकार शिवजयंती काळामध्ये शिवमूर्ती विकण्यासाठी उस्मानाबादमध्ये येत असतात.

Famous Gulab Jamun : उस्मानाबादचा फेमस गुलाबजाम खाल्ला आहे? पाहताक्षणीच पडाल प्रेमात Video

शिवरायांच्या विविध छटांतील मूर्ती

संबंधित बातम्या

सध्या बाजारामध्ये शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या छटांमधल्या आकर्षक मूर्ती विकायला आल्या आहेत. शंभर रुपयांपासून पाच हजारापर्यंतया मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सिंहासनावर बसलेले महाराज, संपूर्ण पेहरावातील चालतानाचे महाराज, अर्धाकृती पुतळा, पूर्णाकृती पुतळा, अशा स्वरूपांमध्ये मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. Osmanabad : कोरोनानंतर शेतकऱ्यांना पहिल्यांदाच संधी, नव्या अनुभवाचा होणार फायदा, Video उस्मानाबादमध्ये कुठे मिळणार शिवमूर्ती? उस्मानाबाद शहरातील जिल्हा न्यायालयाच्या समोरील आवारात मूर्तिकार शिवमूर्ती विकत आहेत. 19 फेब्रुवारी पर्यंत हे मूर्तिकार या ठिकाणी थांबणार आहेत. आपल्यालाही शिवाजी महाराजांची चांगली मूर्ती घ्यायची असेल तर या ठिकाणी भेट देऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या